उरण पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीचा गौरव : ग्रामस्वच्छता अभियानात अव्वल - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

उरण पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीचा गौरव : ग्रामस्वच्छता अभियानात अव्वल

उरण पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीचा गौरव :  ग्रामस्वच्छता अभियानात अव्वल

लढवय्या रोखठोक : उरण


  राज्यातील विविध ग्रामपंचायती आपल्या परिसरातील खेड्यापाड्यांचा विकास करण्यासाठी नेहमीच सज्ज असतात कळत नकळत ग्रामपंचायतीच्या कामकाजाची दखल शासनाकडून घेतली जाते व पुरस्कारांच्या रूपात त्यांचा गौरव देखील  केला जातो मात्र काही मोजक्याच ग्रामपंचायती असतात ज्या विविध पुरस्कारांचे मानकरी वारंवार आपल्या कामकाजाच्या जोरावर पटकावत असतात.
 उरण तालुक्यातील जासई , धुतुम , भेंडखळ या  ग्रामपंचायती
ग्रामस्वछता अभियानात अव्वल ठरल्या असून रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्यावतीने  त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
  तालुका स्तरात जासई ग्रामपंचायत प्रथम , धुतुम ग्रामपंचायत द्वितीय तर विविध पुरस्काराचा मानकरी ठरलेली भेंडखळ ग्रामपंचायत तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आली असून निर्मल पुरस्कार, स्वच्छता पुरस्कार , आदर्श पुरस्कार , अशा गौरवा नंतर पुन्हा एकदा सन २०१७ ते २०१८ या कालावधीतला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा पुरस्कार या पंचायतीने पटकावला आहे .
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षण सन २०१७ ते २०१८ या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आलेला आहे. 
 तर सन २०१८ ते २०१९ कालावधीतील उत्कृष्ठ ग्रामपंचायती म्हणून बोकडविरा , धुतुम  ,म्हातवली , सारडे यांना गौरविण्यात आले आहे .
  ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी , सरपंच , उपसरपंच  व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य चित्रा पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
 या पुरस्कारानंतर भेंडखळ   ग्रामपंचायतीचा गौरव व या पाठोपाठ कौतुक देखील केले जात असून   पुरस्कारानंतर कार्यक्षम अशी कार्यपद्धतीचा ठसा पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीने आपल्या कामकाजातून उमटून दाखवला आहे .
 उरण तालुक्यातील महत्त्वपूर्ण आशा ग्रामपंचायतींमध्ये भेंडखळ या ग्रामपंचायतीचा आवर्जून उल्लेख केला जातो.
 या पंचायतीला याआधी देखील अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे त्यामध्ये निर्मल ग्रामपुरस्कार व सन २००९ या साली ग्रामस्वच्छता अभियान  पुरस्कार देखील या ग्रामपंचायतीने पटकावला होता.
   पंचायतीचे कार्यक्षम ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे यांनी या पुरस्कारातून आपल्या कार्यपद्धतीचा आदर्श कायम ठेवला आहे . ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , सदस्य , ग्रामस्थ व पंचायत समितीच्या मार्गदर्शनातून व
नियोजन व सकारात्मक विचारांच्या जोरावरच हे यश पंचायतीला प्राप्त झाल्याचे तुरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0