हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत ईद साजरी
लढवय्या रोखठोक
पनवेल /
आज संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधव बकरी ईद हा सण आनंदात साजरा करत आहेत.
पनवेलमध्ये देखील आज ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पनवेल शहरातील मुसलमान नाका येथे सारे मुस्लिम बांधव सकाळी नमाज अदा केल्यानंतर एकत्र जमले होते. त्यानंतर याठिकाणी सर्व धर्मीय बांधवाना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ईद उल अदहा बकरी ईद च्या निमित्ताने मुस्लिम बांधवां सोबत हिंदू बांधव देखील यावेळी सहभागी झाले होते.सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने शांती, एकता आणि बंधुप्रेमाचा यावेळी संदेश देण्यात आला.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल पोलीस देखील यावेळी उपस्थित होते. पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद अकबर, मुस्लिम एकता सुरक्षा समितीचे अध्यक्ष नविद हुसेनमियाँ पटेल, सरचिटणीस इरफान तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते जावेद पटेल,जेष्ठ समाजसेवक हमीद धुरु,प्रभाग १४ चे बूथ अध्यक्ष अब्दुल गफूर सय्यद(मुज्जू),समीर खांडे आदी मुस्लिम बांधवांच्या वतीने मुसलमान नाका येथे ईद साजरी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे,पोलिस हवालदार कोळी तसेच अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी बंदोबस्ता दरम्यान उपस्थित होते.