दुःखाच्या संसारावर सुखाची फुंकर : पूरग्रस्तांसाठी ग्रामसेवकांचा पुढाकार
(उरण तालुक्यातील ग्रामसेवकांकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत)
लढवय्या रोखठोक
उरण : विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर तसेच सांगली याठिकाणी पावसाच्या
महातांडवा नंतर येथील खेडे, पाडे उध्वस्त झाले, व या परिस्थिती सुखात असलेले संसार उघड्यावर आले ,
या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर राज्यभरातून विविध स्तराच्या दानशूर मंडळींनी पुढाकार घेत या पूरग्रस्तांना जमेल तशी मदत कोल्हापूर सांगली भागात पोचवण्याचा विडा उचलला यातच खारीचा वाटा म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील ग्रामसेवकांनी कोल्हापूर व सांगली या पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनाश्यक वस्तू पुरवल्या आहेत .
या मदती नंतर या ग्रामसेवकांनी पूरग्रस्तांच्या दुःखावर सुखाची फुंकर मारण्याचा लहानसा प्रयत्न केलेला आहे .
तांदूळ, गहू, तेल, मीठ ,साखर चहा पावडर, हळद, मसाला, विविध प्रकारच्या डाळी , पीठ बिस्कीटचे पुडे, फरसाण त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या उपयुक्त अशा वस्तू यांचा एक संच करून एका गोणीत भरून ६०० हुन अधिक गोणी भरून वस्तू ट्रकच्या मधून पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आले आहे.