कोंकण विभागाकडून पूरग्रस्तांना मदत : नागरिकांना महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांचे आवाहन
लढवय्या रोखठोक
नवीमुंबई प्रतिनिधी
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी कोंकण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षातून आज दोन ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन पाठविण्यात आले.
कोंकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी कक्षाची पाहणी करुन सामान रवाना केले.
पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी आजपासून कोकण विभागीय मदत कक्ष अल्पबचत भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे सुरु करण्यात आला आणि अल्पावधीत जनतेने उत्स्फूर्त मदत दिली.
यावेळी उपायुक्त महसूल सिद्धराम सालिमठ, उपायुक्त पुरवठा शिवाजी कादबाने प्रांत अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले, तहसिलदार अमित सानप, तहसीलदार संदीप चव्हाण, तहसीलदार सत्वशिला शिंदे, तहसिलदार प्रितीलता कौरथी तसेच महसूल आयुक्त कार्यालयातील आणि विभागीय कार्यालयातील विविध शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त दौंड यांनी रायगड जिल्ह्यातील पेण, महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील नुकसानीची पाहणी करुन आढावा घेतला.