गोविंदांना आरोग्यविमा पुरावा : विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

गोविंदांना आरोग्यविमा पुरावा : विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे

गोविंदांना आरोग्यविमा पुरावा
 विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे

लढवय्या रोखठोक

पनवेल : प्रतिनिधी

   दहीकाला गोपालकाला उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे या दहीकाला निमित्त गोविंदा पथक सज्ज झाले असून बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा पथक उंच उंच थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात मात्र या प्रयत्न करत असताना बऱ्याचदा गोविंदा जखमी होत असून दुर्दैवाने गंभीर स्वरूपाची दुखापत होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रकार देखील घडू शकतात त्यामुळे या गोविंदांना विमा संरक्षण देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी महापालिकेने या गोविंदा पथकांना विमा संरक्षण पुरवावे अशी मागणी केलेली आहे.
   गोविंदा पथकात युवा मुलांचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. हंडी फोडताना काही गोविंदा  जखमी होत असतात. तर काहींना आपला प्राण देखील गमवावा लागला आहे. यामुळे पालिका क्षेत्रातील नोंदणीकृत गोविंदा पथकांना महापालिकेने विम्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी महापालिकेला केली  आहे.
 या मागणीवर सकारात्मक पनवेल महानगरपालिका सकारात्मक विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0