सांगली कोल्हापूरातील पुरग्रस्तांना ५० लाखांचा निधी : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची घोषणा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

सांगली कोल्हापूरातील पुरग्रस्तांना ५० लाखांचा निधी : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची घोषणा

सांगली कोल्हापूरातील  पुरग्रस्तांना ५० लाखांचा निधी देणार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची  घोषणा

  लढवय्या रोखठोक
  विशेष प्रतिनिधी / कोल्हापूर

  सांगली आणि कोल्हापुरात महाजलप्रलयाने जनजीवन उध्वस्त झाले असून या भागातील पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपल्या खासदारनिधीतून ५० लाख रुपये देणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी आज कोल्हापूर येथे केली.
 ना. रामदास आठवले आज हैद्राबाद मार्गे कोल्हापूरात सकाळी दाखल झाले. त्यांनंतर त्यांनी कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा  पाहणी दौरा केला. त्यानंतर सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी; पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्याला  २५ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्याला २५ लाख असे एकूण ५० लाख रुपयांचा निधी खासदरनिधीतुन देणार असल्याची घोषणा केली.
  कोल्हापूर मधील रांगोळी, कडोली,इंगळी,आंबेवाडी,
जाधववाडी , कोल्हापूर शहर आदी भागांत रामदास आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या.
 त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या.   कोल्हापूर आणि सांगली मध्ये आलेला महापूर हा महाजलप्रलय होता. त्यातून या पुरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची;मदतीची गरज आहे. या पुरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वांनी मिळून पुरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे; त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन  रामदास आठवले यांनी केले.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0