पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी : पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी
   : पालकमंत्री रविंद्र चव्हाण
                                                     
लढवय्या रोखठोक
अलिबाग / प्रतिनिधी

   जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्तीमूळे झालेल्या नुकसानीचा आढावा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड रविंद्र  चव्हाण यांनी आज राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत घेतला.
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदि उपस्थित होते.
  यावेळी पालकमंत्री रविंद्र  चव्हाण यांनी पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीचा सर्वंकष आढावा विविध विभागाकडून घेतला. विद्युत विभागाने जिल्ह्यामध्ये २४ तासा पेक्षा जास्त लाईट जाणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालये तसेच अति महत्वाचे ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत राहील. पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला पाहिजे. अतिवृष्टीमुळे  बांधबंधिस्तीचे नुकसान झाले आहे त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. कोणत्याही प्रकारची रोगराई पसरु नये याकरीता वैद्यकीय सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. पूरपरिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तात्काळ करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच मृत जनावरांचे पंचनामे करुन संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करावी, जे रस्ते खचले आहेत त्या ठिकाणी सूचना फलक, बॅरेगेट्स लावण्यात यावे, पर्यायी मार्ग तयार करावेत. शाळांचे नुकसान झाले त्यांच्या दुरुस्ती करण्यात यावी. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या  सूचना त्यांनी आधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0