जे एस डब्लू कामगारांवर मृत्यूचे सावट ? - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

जे एस डब्लू कामगारांवर मृत्यूचे सावट ?

जे एस डब्लू  कामगारांवर मृत्यूचे सावट ?

 लढवय्या रोखठोक /
 विशेष प्रतिनिधी

    भारतातच नव्हे तर जगभरात नामांकित असलेल्या पेन तालुक्यातील जेएस डब्ल्यू  या कारखान्यातील कामगारांची सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे .
    पेण तालुक्यातील असंख्य कामगार पोटापाण्यासाठी या कारखान्यात जोखमीची जबाबदारी बजावत आहेत मात्र सकाळी घराबाहेर पडलेला माणूस हा जोपर्यंत संध्याकाळी घरी येत नाही तोपर्यंत तो आपला म्हणावा का ? अशी चिंता या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांना  सतावत आहेत.
  गेल्या दोन महिन्यात सुमारे तीन घटना घडल्या असून त्यात कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे .
 मंगळवारी अशाच एका होतकरू कामगाराचा दुर्दैवी मृत्यू कारखान्यात झाल्याने पुन्हा एकदा संबंधित कंपनीचे नाव मोठे लक्षण खोटे अशीच परिस्थिती समोर आले आहे .
   चंद्रकांत गायकर वय ५४ वर्ष
हे नेहमी प्रमाणे कंपनीमध्ये आपली जबाबदारी पार पाडत असताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर पुन्हा एकदा समाजकारणाची टिमकी वाजवत जे एस डब्लू कारखान्याचे मॅनेजमेंट खडबडून जागे झाले व मृताच्या नातेवाईकांना कवडीमोल मोबदला देऊन व भविष्याचे आमिष दाखवून हे प्रकरण अगदी किड्या-मुंगी च्या मरणासारख भासवून देत आपली भूमिका मांडून मोकळी झाले.
  मात्र या दुर्दैवी झालेल्या घटनेमुळे निष्पाप गेलेला जीव याला जबाबदार कोण ? याबाबत सध्या चिडीचूप पाहावयास मिळत आहे.
या प्रकरणी स्थानिक राजकारणी , सामाजिक कार्यकर्ते गप्प का ? याच उत्तर भेटणं अवघड आहे .
  याबाबत पोलिसांनी कारखान्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0