रस्त्यावरील उघड्या गटारांचा धोका : कळंबोली मनसे आक्रमक - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

रस्त्यावरील उघड्या गटारांचा धोका : कळंबोली मनसे आक्रमक


  रस्त्यावरील उघड्या गटारांचा धोका  : कळंबोली मनसे आक्रमक

कळंबोली : लढवय्या रोखठोक

  कळंबोली शहरात सध्या मेनहोल व पावसाळी पाण्याच्या गटारांच्या झाकणाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत .
  या नादुरुस्त मेनहोल तसेच पावसाळी पाण्याच्या फुटपाथवर वरील असलेल्या गटारांची झाकणे नसल्याने मोठ्या समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
 याबाबत कळंबोली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करत ही झाकणे तात्काळ बसवण्याचे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
   गेला काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे व त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडताहेत पावसाळी पूर्वी करण्याची कामे सिडकोने नेहमीप्रमाणे दिरंगाई करत रामभरोसे केल्याने याचा त्रास कळंबोली वासियांना होत आहे.
  त्याचप्रमाणे या शहरात असलेले नगरसेवक यांना देखील संबंधित प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे .
  कळंबोली येथील सेक्टर पाच येथे महावितरणाच्या कार्यालयासमोर तसेच आयडीबीआय सर्कल या ठिकाणी रस्त्यावरील मेनहोल पूर्णपणे खचल्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झालेला आहे यामध्ये रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे वाहन चालक यांचे अपघात देखील होत आहेत. आतापर्यंत या मेनहोल च्या तोंडावर झाकणे नसल्याने बरेच अपघात दिवसा गणिक वाढत असून यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान व दुखापत झाल्याचे समोर येत आहे त्यामुळे रस्त्यावरील मेनहोल व नादुरुस्त असलेले   फुटपाथ वरील गटारांवर झाकणे त्वरित टाकून कळंबोली वासियांना सहकार्य करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळंबोली शहराध्यक्ष अमोल बोचरे,  शहर उपाध्यक्ष विवेक बोराडे, रामा सावंत  , प्रशांत कदम  यांनी दखल घेत  सिडकोला व पनवेल महानगर पालिकेला मनसे स्टाइल इशारा दिलेला आहे  नादुरुस्त असलेली गटारे   यांच्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी असा इशारा देण्यात आलेला आहे.
  महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे कळंबोली शहर उपाध्यक्ष विवेक बोराडे यांनी लढवय्या रोखला दिलेल्या माहितीनुसार सिडकोने जवळपास बारा लाख रुपयाचे गटारा वरील झाकणांसाठी खर्च केल्याचे सिडकोकडून कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले मात्र शहरातील गटारांची वस्तुस्थिती पाहिली असता या ठिकाणी नवीन झाकणे टाकल्याचे क्वचित आढळत आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे हे बघणे तितकेच महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0