नवी मुंबई राजकारणात श्रेयवादासाठी चढाओढ - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नवी मुंबई राजकारणात श्रेयवादासाठी चढाओढ

नवी मुंबई राजकारणात श्रेयवादासाठी चढाओढ

लढवय्या रोखठोक : नवीमुंबई
 
  नवी मुंबईतील राजकारणात माजी पालकमंत्री गणेश नाईक व आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आपापसातल्या कट्टर विरोधाची प्रचिती सर्वत्र आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा नवी मुंबईकरांना आला नवी मुंबईत असलेली राष्ट्रवादीची सत्ता व या मार्फत राष्ट्रवादीकडून घेतले जाणारे निर्णय यावर भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला व त्यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येथील जनतेची दिशाभूल करत असल्याचे वारंवार मांडले आहे.
    नवी मुंबई शहरातील राजकीय वर्तुळात आगामी निवडणूक रणधुमाळीत आपले राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी तसेच मतांचे राजकारण करून आपले पारडे जड करण्यासाठी शहरात सध्या श्रेयवादाचे चढाओढ सुरू आहे.
  नवी मुंबई शहरात सध्या राष्ट्रवादीची सत्ता असून मोदी सरकारमुळे आगामी काळात या सत्तेला धोका बसू शकते अशी कुठेतरी धाकधूक असून सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष मतदारांचे मन आपल्याकडे वळवण्यासाठी विविध कुलुपक्त्या करीत आहेत.
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार दिनांक ३ रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्याचे जाहीर केले. त्याच दिवशी नवी मुंबई शहरात राष्ट्रवादी पक्षातील शहराचे महापौर जयवंत सुतार यांनी देखील नवी मुंबई शहरात ५०० चौरस फूट घरांच्या मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव येत्या महासभेत आणू असे जाहीर केले . यावर दुसऱ्या दिवशी बेलापूर मतदारसंघातील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी  वाशी मध्ये पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी हे केवळ मतांचे राजकारण करून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणाबाजी करत असल्याचे आरोप केले.  सत्ताधाऱ्यांना खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकांना दिलासा द्यायचा होता चार महिने आधी हा प्रस्ताव त्यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणायला हवा होता ,आत्तापर्यंत तो शासनाकडे मंजुरीकरिता गेला असता. तसेच सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असता ,मात्र त्यांनी तसे न करता निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाची घोषणा करून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूकच सर्वांची जागा दाखवून देईल असेही यावेळी त्यांनी बोलून दाखवले. आगामी दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून पुढील कालावधीत महानगरपालिकेच्या निवडणुका देखील होणार आहेत. यामुळे शहरात देखील आपापली सत्ता आणण्यासाठी राजकीय पक्षाकडून श्रेयवादाची चढाओढ सुरू झाली आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0