रायगड जिल्हा परिषदच्या वतीने
झिरो पेंडन्सी कार्यशाळेचे आयोजन
लढवय्या रोखठोक / अलिबाग
रायगड जिल्हा परिषद यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल या विषयावर कार्यशाळा तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ही कार्यशाळा राबविण्यात येत आहे . उद्या दिनांक २६ रोजी
सकाळी १० ते २ या वेळेत ही कार्यशाळा पार पडणार आहे .
जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजात उपयुक्त माहिती देणारे आदर्श व्यवस्थापन , आयएसओ प्रमाणपत्र, प्रोसेस मॅन्युअल ,क्वालिटी मॅन्युअल, सिक्स बंडल सिस्टीम याबाबत उपयुक्त अशा कार्यशाळेचे आयोजन राबविण्यात आले असून मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेत करता उपस्थित राहावे असे आव्हान मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी केले आहे.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख व्याख्याते माजी उपायुक्त पुणे चंद्रकांत दळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून शासकीय यंत्रणेत कार्यालयीन कार्यपद्धतीचा व दस्तावेज दप्तर यांचे नियोजन कसे असावे याबाबत प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे त्याचप्रमाणे चंद्रकांत दळवी यांच्या झिरो पेंडेन्सी अँण्ड डेली डिस्पोजल हे पुस्तक देखील उपस्थितांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.