पागोटे , नवघर ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी
गुन्हे दाखल करण्याच्या हलचाली
लढवय्या रोखठोक :
उरण प्रतिनिधी
उरण तालुक्यातील पागोटे व नवघर या ग्रामपंचायतीच्या तथाकथित भ्रष्टाचाराबाबत साप्ताहिक लढवय्या व लढवय्या रोखठोक या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केला गेलेल्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर अखेर याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.
उरण तालुक्यातील पागोटे व नवघर ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारप्रकरणी काही महिन्यापूर्वी चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उरण पंचायत समितीला देण्यात आले होते .
साप्ताहिक लढवय्याने या बातम्यांची दखल घेतली व अखेर याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आले आहे .
सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार लवकरच संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे मात्र संबंधित ग्रामसेवक तपास अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव टाकत असल्याने या तपास कामात अडथळा निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे . या सर्वांवर मात करून पंचायत समिती उरण यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्यता तपासून गुन्हे दाखल करणार असल्याची भूमिका दर्शवली आहे .
उरण पंचायत समितीचे कार्यक्षम विस्तार अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असून आता हे गुन्हे केव्हा दाखल केले जाणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे
पागोटे ग्रामपंचायतींमध्ये झालेला कोट्यावधीचा भ्रष्टाचार व नवघर ग्रामपंचायतीच्या कामकाजात तफावत झाल्याची तपास यंत्रणेच्या लक्षात आल्यानंतर या हालचालींना वेग आलेला आहे त्यामुळे आपल्या निष्ठावंत कार्याची टिमकी वाजवणाऱ्या ग्रामसेवकांची पोल-खोल लवकरच चव्हाट्यावर येणार आहे.