कळंबोलीतील नालेसफाईत हाथ सफाई ?
नगरसेवक बबन मुकादमांचा प्रशासनाला जाब
कळंबोली / लढवय्या रोखठोक
कळंबोलीतील असमाधानकारक नालेसफाई बाबत शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक बबन मुकादम यांनी आवाज उठवलेला असून या नालेसफाईबाबत सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे .
कोट्या वधी रुपये खर्च करून करण्यात येत असलेली नालेसफाई पावसाळ्याच्या तोंडावर देखील झालेली नसून होत असलेली नालेसफाई असमाधानकारक असल्याचे स्पष्ट होते .
कळंबोली शहरात होत असलेली नालेसफाई ही केवळ नावापुरतीच होत असून या नालेसफाईचा आढावा बबन मुकादम यांनी घेतला यामध्ये केवळ नाल्यांच्या तोंडावरचा गाळ काढलेला असल्याचे दिसून आले
त्यामुळे अशा नालेसफाईबाबत ही नालेसफाई यशस्वी होत असल्याचे सिडको अधिकारी भासवत आहेत .
अशा असमाधानकारक नालेसफाई मुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा कळंबोली शहरात पूरस्थितीचा फटका बसणार असल्याची भीती मुकादम यांनी स्पष्ट केली आहे .
या नालेसफाईबाबत ठेकेदार व कळंबोली सिडको अधिकारी जबाबदार असून ही नालेसफाई समाधानकारक करण्याची मागणी पत्रात केली जात आहे .
नालेसफाईबाबत योग्य भूमिका न घेतल्यास संबंधित जबादार अधिकारी व ठेकेदारांना काळ्यायादीत टाकण्याची मागणी सिडको संचालक यांच्या कडे करण्यात येणार आहे .
# शहरातील नालेसफाई असमाधानकारक आहे नाल्यांच्या तोंडावरचा गाळ काढला जात असून काढलेला गाळ बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध ठेवण्यात आल्याने पादचाऱ्यांना व वाहनांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे .
नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याने कळंबोली प्रभाग ८ पावसाळ्यात तुंबणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.
बबन मुकादम( नगरसेवक शेकाप )