कोकण विभागीय उपायुक्त
गणेश चौधरी निलंबित ;
शासकीय योजनांचा गैरव्यवहार अंगलट
लढवय्या रोखठोक : मुंबई विशेष प्रतिनिधी
बेलापूर येथील कोकण विभागीय उपायुक्त गणेश चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे . विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोटाळे करून आपल्या पदाचा गैरवापर करत चौधरी यांनी केलेला प्रताप त्यांना चांगलाच भोवला आहे .त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेऊन करण्यात आलेल्या कारवाई नंतर चौधरी यांच्या प्रामाणिक , कार्यक्षम कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून असलेला चारित्र्याचा बुरखा टराटर फाटला आहे .
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा कृषी समृद्धी समन्वित प्रकल्प ( केम ) या प्रकल्पाचे तत्कालीन संचालक असलेल्या गणेश चौधरींना निलंबित केल्याची घोषणा विधानसभेत पवन मंत्री राम शिंदे यांनी केली . चौधरी यांच्याकडे असलेल्या योजनांच्या माध्यमातून सुमारे १० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न होत असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते . यामध्ये डेअरी किट , फोडर किट , पशुधन विकास सारख्या महत्व पूर्ण योजनांचा समावेश आहे .
अशा घोटाळेबाजांना सरकार जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचा आरोप विधान सभेत विरोधकांनी सरकारवर केला. त्यानंतर पवन मंत्री राम शिंदे यांनी निलंबनाचा निर्णय घेतला . गणेश चौधरी कोकण विभागीय उपयुक्त असताना देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात येत आहेत . बेकायदा पद्धतीत आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीतून विविध विभागातील बदली, ग्रामपंचायत बदली यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गौडबंगाल झाल्याची माहिती सूत्रांच्या मार्फत प्राप्त आहे .
शिवाय कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांच्या माध्यमातून त्रास देत त्यांचे खच्चीकरण करून आपल्या मर्जीतील लोकांना बेकायदा पद्धतीने मदत करून आपली झोळी भरून घेण्याचा प्रकार घडला असल्याचे देखील समोर येत आहे .
गणेश चौधरी यांचे मोठ्या प्रमाणात राजकीय लागेबांधे असल्याचे यापूर्वी देखील समोर आले आहे . शिवाय स्वतःच्या कामकाजावर दुर्लक्ष करत रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजात ढवळा ढवळ केल्याचा ही त्यांच्यावर आरोप केला जात आहे . आता गणेश चौधरी यांची कोकण विभागीय उपायुक्त पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी ( केम ) योजने प्रमाणेच याठिकाणी घोटाळे केल्याची शक्यता असल्याने आता या बाबत देखील त्यांची चौकशी सुरू केली जाणार असल्याची शक्यता आहे .
हा अधिकारी शासकीय संघटनेचा नेता असल्याने त्यांच्या विरोधात कोणताही अधिकारी व कर्मचारी बोलण्यास धजावत नसल्याची चर्चा रायगड व कोकण विभाग वर्तुळात सुरू आहे.अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.