शेअरिंग सायकल सेवा सुरू करा : नगरसेवक गुरुनाथ गायकर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शेअरिंग सायकल सेवा सुरू करा : नगरसेवक गुरुनाथ गायकर

  शेअरिंग सायकल सेवा सुरू करा : नगरसेवक गुरुनाथ गायकर

लढवय्या रोखठोक
खारघर : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या रस्त्यांवर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढणारी रहदारी व त्यामुळे रस्त्यांवर चार चाकी वाहने व दुचाकी वाहने यांच्या वाढत्या प्रभावामुळे शहरांमध्ये प्रदूषणाचा समतोल बिघडू लागले आहे , त्यामुळे हा समतोल राखण्यासाठी पनवेल महानगर पालिकेच्या मार्फत शेअरिंग सायकल सेवा सुरू करावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी एका निवेदनाद्वारे  महापालिकेला केली आहे. खारघर शहरात ही शेअरिंग सायकल सेवा सध्या सुरू करण्यात आली असली तरी संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही सायकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

                                 पनवेल परिसराची होणारी झपाट्याने वाढ पाहता महापालिका अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी विविध कल्पना करत आहे,  मात्र चिंचोळ्या रस्त्यांवर वाहनांची होणारी अफाट गर्दी व पेट्रोल डिझेल यांसारख्या इंधनांची होणारी नासाडी  या सगळ्या प्रकारामुळे या परिसरात वाढणारे प्रदूषण यावर आळा घालण्यासाठी शेअरिंग सायकल सेवा हा यावर एकमेव उपाय असल्याचे गुरुनाथ गायकर यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला असून महापालिकेने यावर विचार करावा व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा विषय सकारात्मक हेतूने पहावा अशी मागणी केली गेली आहे.महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0