*नवघर , पागोटे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण*
*प्रधान सचिवांच्याकडे*
*लढवय्या रोखठोक : मुंबई*
ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी लाटून आपले खिसे भरून स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या भ्रष्टाचारी ग्रामसेवकांच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा आता ग्रामविकास प्रधान सचिवांच्या दालनात पाठविण्यात आलेला आहे .
लवकरच याबाबत प्रधानसचिव
याबाबत सकारात्मक पावले उचलून भ्रष्टाचाऱ्यावर योग्याती कारवाई करतील अशी खात्री आहे .
उरण पंचायत समितीच्या हद्दीत असलेल्या पागोटे व नवघर ग्रामपंचायतीचे माजी ग्रामसेवकांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून ग्रामपंचायत विकास कामांच्या निधीमध्ये हेराफेरी करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले.
याबाबत एकमेव साप्ताहिक लढवय्या व लढवय्या रोखठोक च्या संकेतस्थळावरून नियमित बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत . मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केवळ कारवाई करणार असे सांगत आतापर्यंत वेळ मारून नेल्याने जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे देखील घोटाळेबाज ग्रामसेवकांसोबत लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नाही .
रायगड जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत चौकशी करणार असल्याच्या सूचना देत वेळ मारून नेत संबंधित घोटाळेबाज ग्रामसेवकाना पाठीशी घातले आहे .
रायगड जिल्हा परिषद या प्रकरणी कारवाईसाठी आखडता हात घेत असल्याने आता थेट मंत्रालयात प्रधान सचिवांना निवेदन करण्यात आले आहे .
या निवेदनात पागोटे व नवघर भ्रष्टाचारी ग्रामसेवक यांच्या पाठोपाठ यांना पाठीशी घालणारे रायगड जिल्हा परिषद अधिकारी , उरण पंचायत समिती चे अधिकारी यांच्यावर देखील या प्रकरणी दुर्लक्ष केले म्हणून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदना सोबत माहिती अधिकारातून प्राप्त झालेले सर्व कागदपत्रे जोडण्यात आलेली आहेत त्यामुळे आता प्रधान सचिव यांच्या दालनातून या भ्रष्टाचार प्रकरणी कोणती कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्वाचे आहे .