माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका हद्द होणार चकाचक - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका हद्द होणार चकाचक

माजी खासदार  रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त
पनवेल महापालिका हद्द होणार चकाचक

लढवय्या रोखठोक
  पनवेल (प्रतिनिधी)
 माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आगळ्या पद्धतीने सादर करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यानिमित्ताने  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने १ ते १० जून यादरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महा स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पनवेल परिसर स्वच्छ  केला जाणार असून विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
   रामशेठ ठाकूर यांनी गेल्या तीन दशकात  राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे . या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. २ जून रोजी रामशेठ ठाकूर यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो . यंदा विकास मंडळाच्या वतीने पनवेल महापालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
  रस्ते, गटार, पदपथ दहा दिवसात स्वच्छ करण्यात येणार आहेत. याबरोबर औषध फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी, मनुष्यबळ, पावडर विकास मंडळाच्या वतीने पुरवण्यात येणार असल्याचे परेश ठाकूर म्हणाले. पनवेल महानगरपालिका हद्दीत २० प्रभागांचा समावेश आहे. त्यामध्ये समाविष्ट गावांचा ही अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याठिकाणी महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. यानंतर स्वच्छतेवर भर देत हा परिसर कायम स्वच्छ ठेवण्यात येणार आहे.
   भाजपाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हा प्रवक्ते वाय . टी. देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने ०२ जून रोजी रात्री ८ वाजता प्रसिद्ध गायक व निवेदक अंशुमन विचारे यांचा 'चाल तुरु तुरु' हा गाण्यांचा व किश्यांचा  संगीतमय हास्यकल्लोळ कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार  आहे.महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0