घाटी मराठी संघटना राष्ट्रवादीत विलीन होणार ? - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

घाटी मराठी संघटना राष्ट्रवादीत विलीन होणार ?

घाटी मराठी संघटना राष्ट्रवादीत विलीन होणार ?


लढवय्या रोखठोक / शैलेश चव्हाण
   कळंबोली शहरात सन २०१४ ला शहरातील घाटी व मराठी विचारांच्या लोकांना एकत्र घेऊन स्थानिक प्रश्नांवर झळझळीत अंजन घालण्यासाठी व येथील लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या घाटी मराठी संघटनेला आता राजकीय झालर लागण्याची शक्यता  आहे .
  या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड हे सध्या सातारा बारामतीच्या राष्ट्रवादीच्या दिग्गज पुढाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे,
 कळंबोली शहरात भारतीय जनता पार्टी , शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या चार वर्षापासून घाटे मराठी संघटना आपले अस्तित्व बनू पाहत आहे काही प्रमाणात या संघटनेला यश देखील प्राप्त झाल्याचे बोलले जाते मात्र सध्या मावळ लोकसभा निवडणुकीपासून ही संघटना बारामती व साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलेला आहे .
  पनवेल तालुका व कळंबोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील या गोष्टीची कल्पना नसून ही संघटना राष्ट्रवादीच्या गळाला लागणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे .
 सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे ,  गुलाबराव जगताप त्याच प्रमाणे निलेश लंके अशा दिग्गज व नामांकित पुढाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत त्यामुळे सामाजिक कार्य करण्याचा वसा उचललेली घाटी मराठी संघटना आता राष्ट्रवादीच्या गळाला लागणार का असा उलट सुलट चर्चा सुरु झालेले आहेत .
   घाटी मराठी संघटनेने  गेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पार्टीने घाटमाथ्यावरील उमेदवारांना दिलेले प्राधान्य पाहता या संघटनेने भारतीय जनता पार्टीला देखील पाठिंबा दिला होता मात्र मावळ लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा संपर्क सोडून घाटी मराठी संघटना राष्ट्रवादीकडे कशी आकर्षित झाली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे .
   संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्याशी याबाबत संपर्क केला असता  त्यांनी  याबाबत बोलण्यास नकार दिला.
   त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय खळबळ सुरू आहे याचा अंदाज मांडणं कठीण असलं तरी वायरल झालेल्या फोटोच्या आधारे व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट होत आहे.
 मावळ लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी संघटनेच्या अध्यक्ष गायकवाड यांच्या घरी भेट दिल्याचे हि बोलले जाते त्यामुळे आता घाटी मराठी संघटना पूर्ण रूपाने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी साठी काम करणार का? किंवा या संघटनेच्या माध्यमातून नेमकी अजून कोणती गणिते समोर येणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0