महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समितीच्या उपाध्यक्षपदी संतोष मोकल
लढवय्या रोखठोक / कळंबोली
लढवय्या रोखठोक / कळंबोली
कळंबोली शहरातील युवा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या संतोष नामदेव मोकल यांची महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती महाराष्ट्र राज्य नवी मुंबई उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे संतोष मोकल हे कळंबोली राम मंदिर अध्यक्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासत ते वारंवार सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलताना दिसतात नुकत्याच निवृत्त करण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न हाताळण्यासाठी ते पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी लढवय्या रोखठोक शी बोलताना सांगितले, या नियुक्तीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.