स्नेहसंमेलनातून ४० वर्षांच्या बालमित्रांची भेट - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

स्नेहसंमेलनातून ४० वर्षांच्या बालमित्रांची भेट

स्नेहसंमेलनातून ४० वर्षांच्या   बालमित्रांची भेट 
लढवय्या रोखठोक / शैलेश चव्हाण


आपल्या बालपणीच्या मित्र-मैत्रिणी च्या सोबत एका बाकावर बसलेला तो क्षण एका डब्यात  खाल्लेली पोळी भाजी त्याचप्रमाणे शाळेत केलेला दंगा यांची जर आठवण झाली तर चेहऱ्यावर आपसूकच स्मितहास्य आल्याशिवाय राहत नाही , मात्र आठवण पुन्हा उजाळा भेटला तर ? असं जरी वाटलं तर ते शक्य नाही मात्र त्यावेळचे आपले शालेय वर्ग मित्र मैत्रिणी भेटले तर त्या आठवणी अधिकच उजळून जाऊ शकतात याचाच प्रत्यय देवगड तालुक्यातील  नारिंग्रे येथील एसबी राणे  हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला .
   येथील काही विद्यार्थ्यांनी नियोजनाने घेतलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून चाळीस वर्षांपूर्वीचे जुने मित्र मैत्रिणी एकत्र आले .
  सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील एस बी राणे हायस्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला या कार्यक्रमादरम्यान सण १९७९ च्या सालातील शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा मोठा सहभाग होता .
तब्बल चाळीस वर्षांनी हि मंडळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र या स्नेहसंमेलनाच्या छताखाली आली होती .
  सर्वत्रच शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केली जाते मात्र देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील  एसबी राणे हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांनी चाळीस वर्षाहून अधिक आपल्या जुन्यात मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा अनुभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवला या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या काळात नित्यनियमाने होणाऱ्या प्रार्थनेने झाली.
यासर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी विद्याधर कदम व भालचंद्र देसाई यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून सुरुवातीला ग्रुप बनवून संपूर्ण विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्यासाठी पुढाकार घेत हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी निवृत्त शिक्षकांचा सहभाग होता यावेळी ओगले सर ,रमेश भावे , भरत बापट ,वाडये गुरुजी , केळकर मॅडम उपस्थित होत्या .    त्याकाळी या शिक्षण संस्थेत शिकणारे विद्यार्थी आज डॉक्टर , वकील ,शासकीय अधिकारी शिक्षक , शासकीय कर्मचारी यासारख्या मोठ्या पदांवर कार्यरत असून बरेच विद्यार्थी सेवानिवृत्त देखील झालेले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सुखदुःखात एकमेकांना सहकार्य व्हावे यासारख्या प्रमुख विषयांसह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
  येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी उषा खंडकर परब यांनी केले अशाच प्रकारे स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून वारंवार भेटीगाठी व विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे येथील माजी विद्यार्थी व शिक्षकांनी बोलून दाखविले.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0