अनधिकृत बांधकाम करावाईचा पनवेल पालिकेला विसर
गेल्या वर्षभरात कारवाई थंडावली
शहरात अनधिकृत बांधकामाचा पसारा वाढला
लढवय्या रोखठोक
पनवेल ( शैलेश चव्हाण )
पनवेल महानगरपालिका स्थापन होताच माजी आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम, सार्वजनिक जागेचा वापर यांच्यावर कारवाईचा धडका सुरू केला होता, परंतु गेल्या वर्षभरापासून कारवाई थंडावली दिसत आहे. यानिमित्ताने अनधिकृत बांधकाम करावाईचा पनवेल पालिकेला विसर पडला का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पनवेल महानगरपालिकेचे माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या कार्यकाळात पनवेल भागात असलेल्या अतिक्रमण बांधकामावर जोरदार मोहीम हाती घेऊन बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्यात येत होते.
शिवाय बेकायदा पद्धतीत शहरात फेरीवाल्यांच्या बस्तानवर देखील अंकुश ठेवण्यात पालिकेला मोठ्या प्रमाणात यश येत होते . मात्र सद्यस्थितीला पनवेल महानगर पालिकेचे कामकाज सुस्तावले असल्याच्या भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.पनवेल महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्रमुख शहरांपैकी पनवेल, कळंबोली ,कामोठे ,खारघर ,तळोजा या भागात पुन्हा बेकायदा बांधकामांना अभय मिळाले असून बेकायदा पद्धतीत उभे राहणाऱ्या बांधकाम बाबत आता संबंधितांना पनवेल महानगरपालिकेचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे . कळंबोली शहरात मोकळ्या भूखंडांवर बेकायदा झोपड्या ,अवैध पार्किंग सर्रास सुरू आहे. मात्र याबाबत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी मौन बाळगले दिसत आहे. पनवेल महानगरपालिका उदयास आल्या नंतर सुरुवातीला पनवेल महानगर पालिकेच्या कामकाजाचा धडाका व स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल या ब्रीद वाक्य खाली महानगरपालिका वावरत होते . मात्र सध्या महानगरपालिकेची उदासीनता पाहून शहराला पुन्हा मरगळ लागल्याचे दिसते. पनवेल महानगरपालिकेने सध्या स्वच्छतेवर अधिक भर दिलेला दिसतो. वेळोवेळी रस्त्यांची स्वच्छता शहरातील कचऱ्याचे नियोजन हे योग्य प्रकारे होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिलेल्या असून मात्र पूर्वी ज्याप्रकारे पनवेल महानगरपालिका बेकायदा बांधकाम व अतिक्रमण याबाबत जी मोहीम हाती घेत होती , ते आता होताना दिसत नसल्याने आयुक्त गणेश देशमुख यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे . पनवेल एसटी स्टँड समोरील ट्रॅव्हल्स एजन्सी चे बेकायदा पद्धतीत कार्यालय आहेत .या कार्यालयांवर पनवेल महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यादेश काढून ही बांधकामे तात्काळ कारवाई करून तोडण्यात आली होती. मात्र पुन्हा याठिकाणी जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेच्या कामकाजावर शंका उपस्थित केली जात आहे.