कामोठेतील दारूच्या दुकानावर कारवाई - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कामोठेतील दारूच्या दुकानावर कारवाई

कामोठेतील दारूच्या दुकानावर  कारवाई
वेळेनंतर दुकान उघडे ठेवून बिअरची विक्री

लढवय्या रोखठोक 
कामोठे : प्रतिनिधी   
       निश्चित केलेल्या वेळेनंतर दुकान उघडे ठेवून बिअरची विक्री करणाऱ्या दुकानाची अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक यांना प्लॉट नं ३७, कामोठे, सेक्टर २० मधील सावित्री बिअर शॉप हे दुकान रात्री ११ वाजून ५ मिनिटानंतर सुरु असल्याचे शिवाय या दुकानातून ग्राहकांना बिअर पिण्यासाठी देण्यात येत असल्याचे आढळले.
महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ च्या कलमान्वये दुकानदारास नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. शिवाय महाराष्ट्र विदेशी मद्य नियम १९५३ अंतर्गत नियम देखील पाळले पाहिजेत.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत मद्य विक्री दुकानांसाठी विहित वेळ निश्चित करण्यात आली आहे  मात्र सदरील दुकाने त्याचा भंग केल्याने  हि कार्यवाही करण्यात आली.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0