झाडे लावली जगवायची कशी ?
कळंबोली : लढवय्या रोखठोक
कळंबोलीत बऱ्याच ठिकाणी शासनाच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेला पाठिंबा देत मागील पावसाळ्यात वृक्ष लागवडीसाठी एकत्र येत तरुणांनी झाडे लावली खरी मात्र ही झाडे आता जगवायची कशी अशी चिंता आता भेडसावत आहे.
कळंबोलीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पावसाळ्यापूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांची चांगल्या प्रमाणात वाढ होत आहे , मात्र सध्या बसत असलेल्या तीव्र उन्हाच्या झळा व पाण्याची कमतरता पाहता या झाडांना पुरेसे पाणी देण्यासाठी युवा मंडळी पुढे आली असून सिडको कडे ते झाडांना पाणी देण्यासाठी विनंती करत आहेत, पण विनंती अर्ज करून देखील कोणत्याही प्रकारे झाडांना पाणी देण्या करीता संबंधित प्रशासन लक्ष देत नसल्याची खंत युवा मंडळी व्यक्त करीत आहेत.
कळंबोली शहरात मागील पावसाळ्यात शहरातील युवा तरुण मंडळींनी एकत्र येत कळंबोली केली कॉलेज लगत असलेल्या मोकळ्या मैदानात वृक्ष लागवड केली या रोपांचे रूपांतर झाडांमध्ये झालेला असून त्यांना त्यांची पुढची वाढ होण्यासाठी आता पाण्याचे अत्यंत आवश्यकता असून दोन दिवसांनी एखादा टँकर तरी पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी केली जात आहे . अन्यथा ही सगळी झाडे या उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे करपून जाण्याची भीती निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत .
कळंबोली शहरातील निसर्गप्रेमी व वृक्षमित्र वैभव फाळके,महेंद्र खबाले,नागेश साळुंखे,योगेश शर्मा, नवनाथ राऊत,बंटी शर्मा यांच्यासह अनेक निसर्गप्रेमी सध्या ही झाडे वाचवण्यासाठी प्रशासनाला साकडे घालत आहेत. याबाबत सिडको प्रशासन व पनवेल महानगरपालिका कोणती दखल घेते हे पाहणे गरजेचे आहे.