लोकसभा निवडणुकीमुळे घोटाळेबाज ग्रामसेवक मोकाट - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

लोकसभा निवडणुकीमुळे घोटाळेबाज ग्रामसेवक मोकाट

लोकसभा निवडणुकीमुळे
घोटाळेबाज ग्रामसेवक मोकाट

  पनवेल / लढवय्या रोखठोक

  मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना याचाच फायदा  उरण ग्रामपंचायत भ्रष्टाचार करणाऱ्या घोटाळेबाज ग्रामसेवकांना झालेला आहे .
साप्ताहिक लढवय्या याच्या माध्यमातून "उरण भ्रष्टाचाराचे कुरण" या लेखाखाली उरणमधील नवघर व पागोटे ग्रामपंचायतीचा लाखोंचा भ्रष्टाचार बाहेर आला माहिती अधिकारातून उघड झालेल्या या महितीनंतर  रायगड जिल्हा परिषदेने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत मात्र,  उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व येथील तपास अधिकारी यांनी सध्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे संबंधितांवर कारवाई करणे सध्यातरी शक्य नसल्याचे कारण दिले आहे.
 त्यामुळे ही निवडणूक होईपर्यंत घोटाळेबाज ग्रामसेवक मोकाट राहणार असून सध्या ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना गळ टाकत आहेत . स्वतःच्या कारकिर्दीत निष्पाप लोकांना चुकीच्या पद्धतीत वर्तणूक देऊन त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचे काम आत्तापर्यंत येथील एका चौकटीच्या च्या माध्यमातून आतापर्यंत होत आलेला आहे त्यामुळे हम करे सो कायदा असं ब्रीद वाक्य उराशी बाळगून वावरणाऱ्या व उरण परिसरात आपली दहशत करू पाहणाऱ्या  चौकटीचे सध्या या प्रकरणानंतर अक्षरशः धाबे दणाणले आहे त्यामुळे आता यांना तारणारे देखील या प्रकरणात हात घालण्यासाठी विचार करत आहेत.
  निवडणुकीचा काळ असल्याने
यामुळे यांची या प्रकरणातून सुटका होईल असं यांना जरी वाटत असले तरी केलेल्या कर्माची फळे उशिरा का होईना त्यांना भोगावी लागणार आहेत.
 मात्र ही कारवाई लवकरच होईल अशी खात्री रायगड जिल्हा परिषदेच्या सकारात्मक कामकाजातून वाटत आहे.
तसेच लढवय्याच्या बातमीची घेतलेली दखल यामुळे करवाईतर होणारच अशी  खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून प्राप्त झाले आहे .
  शिवाय याबाबत लढवय्याने वारंवार पाठपुरावा केलेला आहे , त्यामुळे हे प्रकरण तडीस लावेपर्यंत लढवय्या आपली रोखठोक भूमिका मांडता येणार आहे.
   नवघर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आकाश पाटील व पागोटे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वैभव पाटील यांना आता रायगड जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराच्या काळ्या यादीत  यांना टाकण्यात यावे अशी एकीकडे मागणी जोर धरत आहे .
 मात्र लोकसभा निवडणूक होईपर्यंत यांना सध्या तरी अभय मिळाल्याने  कोणतीही कारवाई न करण्याची नामुष्की उरण पंचायत समितीच्या  अधिकाऱ्यांवर ओढवलेली आहे .
 पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासोबत या प्रकरणाच्या पाठपुरावा दरम्यान संपर्क साधला असता सध्या पंचायत समितीकडे निवडणुकीमुळे कर्मचारी नसल्याने ही कार्यवाही काही काळ थांबवावी लागली असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.
 तर रायगड जिल्हा परिषदेचे अधिकारी त्वरित कारवाई करणार असल्याचे सांगत असल्याने या प्रकाराबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

  # रायगड जिल्हा परिषदेकडून या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश उरण पंचायत समितीला देण्यात आल्यानंतर तेथील तपास अधिकारी यांची मात्र मोठी पंचायत झाल्याचे दिसते. कारण आकाश व वैभव यांनी इतक्या वर्षात उरण भागात दमदाटी करून व अधिकाऱ्यांना स्वतःच्या मुठीत ठेवून केलेली दहशत या दहशतीचे परिणाम संबंधित अधिकाऱ्यांवर दिसत आहेत त्यामुळे हे अधिकारी घोटाळेबाज ग्रामसेवकांना घाबरत असल्याची माहिती देखील समोर येत आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0