सराफाला लुटणारे चौघे पोलीस बडतर्फ - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

सराफाला लुटणारे चौघे पोलीस बडतर्फ

आचारसंहितेचा धाक दाखवून

सराफाला लुटणारे चौघे पोलीस बडतर्फ
लढवय्या न्यूज नेटवर्क
मुंबई,  : आचारसंहितेचा धाक दाखवून उदगीर (लातूर) येथे सराफी व्यापाऱ्याची काल १.५ लाख रुपयांची लूट केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ४ पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांनी दिली.

उदगीर (लातूर) येथील सराफी व्यापारी सचिन बालाजी चन्नावार यांनी लातूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. ते काल रात्री ६ लाख रुपयांच्या रोख रकमेसह घरी जात असताना त्यांना ४ पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवून पैशाबाबत चौकशी केली. त्यानंतर आचारसंहितेचा धाक दाखवून १.५ लाख रुपये काढून घेत उर्वरित रक्कम चन्नावार यांना परत केली.

 चन्नावार यांच्या तक्रारीनुसार पोलीस शिपाई श्रीहरी राम डावरगवे, श्याम प्रभाकर बडे, महेश बापूराव खेळगे, रमेश पंढरीनाथ बिर्ले यांच्यावर भा.दं.वि. कलम ३९२, ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या चौघांना अटक करण्यात आले असून लातूर पोलीस अधीक्षकांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0