पनवेल रेल्वे स्थानकात बैठक व्यवस्थेचा अभाव : चाकरमानी हैराण
पनवेल : लढवय्या रोखठोक
पनवेल रेल्वे स्थानकात सध्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे . याठिकाणी तासंतास लांब पल्ल्याच्या गाड्या ची वाट पाहत असताना त्यांना या स्थानकात बसण्यासाठी बैठक व्यवस्था अल्प प्रमाणात असल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरील कठड्यांवर , जिन्यावर त्याचप्रमाणे त्याठिकाणी असलेल्या लगेज समानांवर बसावे लागत आहे .याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन प्रवाशांच्या या समस्येचे निवारण करणे गरजेचे असल्याचे संतप्त प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत .
सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्याने चाकरमानी कोकणात जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर येत थांबतात मात्र या ठिकाणी अपुरी बैठक व्यवस्था त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे.