बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कामोठे : लढवय्या रोखठोक

मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचा खरपूस समाचार घेतला या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदार संघात आलेल्या बारामतीचे पार्सल बारामतीला  पाठवा असे म्हणाले . कामोठे येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
 ज्या उमेदवाचे मतदान देखील बारामती ला आहे असा उमेदवार आमच्या मावळ मतदार संघाचा काय विकास करणार असा प्रश्न माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित केला.
   पुढे मुख्यमंत्री म्हणाले भारतीय जनतापार्टी च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून झालेल्या विविध योजना व नागरिकांच्या भवितव्याचे घेतले जाणारे निर्णय याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीला शंका येत आहे पुलवामा या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोट येथे भारतीय जवानांनी केलेल्या एअर स्ट्राइक बाबत विविध देशांनी जवानांचे कौतुक केले मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी यांना या  एअर स्ट्राईकचा पुरावा लागतो ही खेदाची बाब असून काँग्रेस-राष्ट्रवादी चा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
 मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले तुम्हाला जर एयर स्ट्राइक चा पुरावा हवाच असेल हे आम्हाला जर आधी माहिती असतं तर आम्ही तुमचा एखादा नेता त्या एअर स्ट्राइक ला बांधून पाठवला असता असा त्यांनी यावेळी टोला लगावला .
 शेवटी ते म्हणाले की एक वेळ मला मुख्यमंत्री नाही केलं तरी चालेल किंवा मावळच्या उमेदवाराला निवडून नाही दिले तरी चालेल मात्र भारत वाचवायचा असेल , भारताचे संविधान वाचवायचे असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही असे बोलून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे कानउघडणी करीत उपस्थितांना संबोधिले .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0