पार्थ पवार यांचा खारघर मध्ये गाठीभेटी दौरा
लढवय्या रोखठोक
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचा आज खारघर मध्ये गाठीभेटी दौरा करण्यात आला. यावेळी पार्थ पवार यांनी खारघर मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
या प्रचार दौऱ्यात सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, नगरसेवक हरीश केणी, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सरचिटणीस शेकाप गणेश कडू, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक गुरू रायकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बळीराम नेटके, महिला शहराध्यक्ष राजश्री कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, सरचिटणीस मनोज शारबिद्रे आदी उपस्थित होते.
पार्थ पवार यांनी सकाळी खारघर मधील कोपरे गावापासून प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर सेक्टर १०, सेक्टर ०८, सेक्टर ०२, सेक्टर ०७, सेक्टर ११ मधील सर्व सोसायटी मध्ये गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा पूर्ण केला. या खारघर भागातील नागरिकांनी आपल्या सर्व समस्या पार्थ पवार यांना सांगितल्या व त्या सोडविण्याची मागणी केली.