७५ हजार लिटर दारू जप्त
९७ जनांना अटक
राज्यउत्पादन शुल्काची कारवाई
अलिबाग : लढवय्या रोखठोक
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी रायगड जिल्ह्यात कारवाई करून सुमारे ७५ हजार लिटर्स मद्य जप्त केले अशी माहिती विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात कारवाईचा वेग वाढविण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य प्रकारांना रोखण्यासाठी पाऊले उचलली आहेत. निवडणुकीच्या काळात गावठी दारू भट्ट्या आणि वाहतुकीवर सुद्धा पोलिसांनी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त केले आहे.
एकंदर गेल्या महिन्याभरात १८६ प्रकरणे दाखल केली गेली आणि ९७ जणांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या दारूत हातभट्टी २८०७ लिटर्स, ७० हजार ४३५ लिटर रसायन, देशी दारू २२७ लिटर, १९४ लिटर बिअर, इत्यादी.
आत्तापर्यंत ९ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत ७ लाख ५६ हजार इतकी होते. इतर मुद्देमाल व साहित्य २६ लाख ३२ हजार १२३ इतक्या रुपयांचे आहे. अशा रीतीने ३३ लाख ८८ हजार १२३ रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली आहे.