पनवेलमध्ये जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा संपन्न - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा संपन्न

पनवेलमध्ये जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा संपन्न

लढवय्या रोखठोक

  • पनवेल प्रतिनिधी , 

पनवेल येथे रायगड अँमेचूअर हँडबॉल असोसिएशन यांच्यावतीने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा९वीच्या १२ वर्षा खालील तसेच २रीतील १० वर्षा खालील मुले व मुलींकरिता दि.१४ रोजी खांदा कॉलनी येथील सी.के.टी. महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेकरिता रायगड जिल्ह्यातील ७ शाळांमधून एकूण २४ संघ सहभागी झाले होते. १० वर्षा खलील मुलांच्या गटात न्यू होरायजन पब्लिक स्कूल पनवेल विजयी तर सेंट जोसेफ स्कूल खांदा कॉलनी उपविजेता ठरला. १० वर्षा खलील मुलींच्या गटात ऐ. पी. जे. स्कूल खारघर विजयी तर न्यू होरायजन पब्लिक स्कूल पनवेल उपविजेता ठरला.१२ वर्षा खलील मुलांच्या गटात न्यू होरायजन पब्लिक स्कूल पनवेल विजयी तर सेंट जोसेफ स्कूल खांदा कॉलनी उपविजेता ठरला. १२ वर्षा खलील मुलींच्या गटात ऐ. पी. जे. स्कूल खारघर विजयी तर न्यू होरायजन पब्लिक स्कूल पनवेल उपविजेता ठरला.
या स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू शैली भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव देवेंद्र चौगुले, उपाध्यक्ष विनोद नाईक तसेच संगम डंगर, प्रशांत महल्ले, नितीन घारे, सतीश मोकल, सुशांत जुवळे, गिरीश मोहिते क्रीडा शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0