राज ठाकरेंच्या भाषणाच्या स्क्रिप्ट बाबत शरद पवारांचे मौन . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

राज ठाकरेंच्या भाषणाच्या स्क्रिप्ट बाबत शरद पवारांचे मौन .

राज ठाकरेंच्या भाषणाच्या स्क्रिप्ट बाबत शरद पवारांचे मौन .

पनवेल : लढवय्या रोखठोक


भारतीय जनता पार्टी पक्षाच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भारतीय जनता पार्टी तसेच फडणवीस सरकारवर आपल्या शैलीत भाषणातून  गेल्या काही दिवसापूर्वी  निशाणा साधला त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर म्हणून आपल्या भाषणातून राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली . राज ठाकरे हे बारामतीच्या स्क्रिप्टवर भाषण देत असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या या भाषणानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे .
  पनवेल येथील कळंबोली याठिकाणी पार पडलेल्या माढा लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी तर्फे आयोजित सुसंवाद मेळाव्यादरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत आपल्या भाषणातून काही स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे फडणवीसांच्या या टीकेवर भाष्य केले नाही .
   याबाबत पत्रकारांनी त्यांना राज ठाकरे यांच्या स्क्रिप्ट बाबत व मुख्यमंत्री यांनी ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारणा केली असता पवार यांनी कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे फडणीसाच्या म्हणण्याप्रमाणे राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट शरद पवार देतात का हे मात्र गुलदस्त्यात आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0