नवघर ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी आदेश : लढवय्याच्या बातमीचा दणका - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नवघर ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी आदेश : लढवय्याच्या बातमीचा दणका

नवघर ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी आदेश :
लढवय्याच्या बातमीचा दणका
 #भ्रष्टाचारी ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
लढवय्या रोखठोक ; अलिबाग

    उरण भ्रष्टाचाराचे कुरण या मथळ्याखाली साप्ताहिक लढवय्याने गेल्या काही दिवसांपासून या हद्दीतील नवघर ग्रामपंचायत व पागोटे ग्रामपंचायत यांचा भ्रष्टाचार माहिती अधिकारातून चव्हाट्यावर आणला याबाबत सखोल व सविस्तर वृत्त प्रकाशित करून अखेर  या बातमीला उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अलिबाग येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून साप्ताहिक लढवय्याचे कौतुक देखील केले जात आहे .
  उरण पंचायत समिती हद्दीतील नवघर व पागोटे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारप्रकरणी साप्ताहिक लढवय्याने वारंवार पाठपुरावा केला आणि या प्रकरणी अखेर लढवय्यांच्या बातमीची दखल घेत जिल्हा परिषद अलिबाग यांनी या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतींच्या तात्काळ चौकशीचे आदेश काढलेले आहेत त्यामुळे आता या भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायती व संबंधित भ्रष्टाचार करणारे ग्रामसेवक यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आलेली आहे .
नवघर ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे माजी ग्रामसेवक आकाश पाटील यांच्या कारकिर्दीतील दप्तर गहाळ असल्याचे तपासात निष्पन्न होत असून याबाबतची तक्रार ग्रामपंचायत विभागाने जिल्हा परिषद  अलिबाग यांना पाठवल्यानंतर हा प्रकार उघड झाला  साप्ताहिक लढवय्याने ही याबाबत वारंवार पाठपुरावा करून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीचा लेखाजोखा कोकण आयुक्त त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे ठेवल्यानंतर याबाबत आता सकारात्मक पावले उचलण्यासाठी सुरुवात झालेली आहे . मात्र नवघर ग्रामपंचायती पाठोपाठ उरण येथील पागोटे या ग्रामपंचायती बाबत अद्याप कोणती भूमिका जिल्हा परिषदेने घेतली नसल्याने याबाबतदेखील तात्काळ चौकशीचे आदेश काढून भ्रष्टाचार करणाऱ्या भामट्यांवर कारवाईचा बडगा उचलणे गरजेचे आहे . लढवय्या ला मिळालेल्या माहितीनुसार नवघर व पागोटे ग्रामपंचायत हद्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड उघड दिसत आहे . त्यापैकी महत्त्वाचे मुद्दे म्हणजे नियमबाह्य खर्च,
 तीन लाखाच्यावर ई-टेंडरिंग अनिवार्य असताना देखील शासनाच्या या नियमांना केराची टोपली दाखवत संबंधित ग्रामसेवकांनी आपल्या मर्जीच्या ठेकेदारांना हाताशी घेऊन लाखो रुपये कामे फक्त कागदोपत्री केलेली आहेत , दुसरीकडे ग्रामपंचायत हद्दीत केली जाणारी विकास कामे हे एकाच ठेकेदारामार्फत कशी काय झाली हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहिती अधिकारात बँक स्टेटमेंट व व्हाउचर फाईल यामध्ये मोठी तफावत पाहावयास मिळत आहे यासारख्या बऱ्याच गोष्टी नवघर व पागोटे या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांच्या हातून घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे गौडबंगाल करणाऱ्यांना लवकरच आपल्या पापाची फळे भोगावी लागणार आहेत अशी खात्रीदायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे .
  पागोटे येथील ग्रामसेवक वैभव पाटील व नवघर येथील ग्रामसेवक आकाश पाटील यांच्यासह अजून त्यांचे इतर ग्रामसेवक सहकारी देखील या भ्रष्टाचाराच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे लवकरच यांचीही माहिती समोर येणार असून याबाबत काही सामाजिक संस्था व राजकीय मंडळी सक्रिय झाले असून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीत होणाऱ्या भ्रष्टाचाराचे रॅकेट लवकरच लढवय्याचा मार्फत उघड होणार आहे.

 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0