पनवेलमध्ये कुंग फू चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा संपन्न - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये कुंग फू चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा संपन्न

पनवेलमध्ये कुंग फू चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा संपन्न
पनवेल / लढवय्या रोखठोक
कूंग फयू स्पोर्टस् असोसिएशन मुंबईच्यावतीने पनवेलमध्ये प्रथमच मुंबई विभागीय कुंग फू चॅम्पियनशिप कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांच्या हस्ते झाले.
पनवेल तालुका क्रिडा संकुलामध्ये झालेल्या या चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केएफएसए ओएमचे अध्यक्ष विवेक द्विवेदी, उपाध्यक्ष इस्सार शेख, सचिव अजय सिंह बुंदेला, खजिनदार ओमकार पवार तसेच सूरज नाईक, यश पाखरे, शिफा सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. 
आपल्या उद्घाटनपर भाषणात स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांनी क्रिडा खेळाचे महत्व विषद केले. स्वसंरक्षणासाठी कराटेचे शिक्षण आवश्यक असून अशा चॅम्पियनशीप स्पर्धांमधून स्पर्धकांना आपल्यातील गुणांचे प्रत्यक्ष सादरीकरण करता येईल, यातीलच असंख्य कराटे खेळाडू राज्य, देश तसेच जागतिक पोहचतील असे मत विजया कदम यांनी व्यक्त केले. 
या चॅम्पियनशीप कराटे स्पर्धेत सुमारे शंभर स्पर्धक सहभागी झाले होते. चेंबूरच्या मार्शल आर्टसला चॅम्पियनशीन 2 ट्रॉफी तर मुंबईच्या कुंग फू स्पोर्टस् असोसिएशनला 1 सेंट चॅम्पियनशीप ट्रॉफी मिळाली. प्रमुख उद्घाटक पाहुण्या विजया कदम यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेच्या संयोजनाबद्दल सर्वांनीच कौतुक केले.  



महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0