माथाड्यांची काळजी भाजपलाच : नरेंद्र पाटील
आघाडी सरकारला १४ वर्षात जे जमलं नाही ते भाजपने २ वर्षात केलं .
नवीमुंबई : लढवय्या रोखठोक
कळंबोली येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माढा लोकसभा मतदार संघा तर्फे आयोजित सुसंवाद मेळाव्यादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत
भारतीय जनता पार्टी विरोधात रणशिंग फुंकले भारतीय जनता पार्टीने शेतकरी त्याचप्रमाणे येथील माथाडी कामगारांचे नुकसान केल्याचे वक्तव्य कालच्या भाषणातून आमदार शशिकांत शिंदे व कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्या भाषणातून करण्यात आले होते . याचाच खुलासा म्हणून नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत आमदार शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांचा खरपूस समाचार घेतला
शरद पवार यांच्यासमोर आपण खूप काही कर्तुत्व केलेले नेते असल्याचे भासविण्यासाठी त्यांनी फडणीस सरकारवर केलेली टीका ही फक्त प्रसिद्धी पोटी असल्याचे त्यांनी सांगितले
स्वयंघोषित माथाडी नेत्यांनी आपली जीप सांभाळा असा टोला त्यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर लगावला आघाडी सरकारच्या काळात कोणत्या माथाडी नेत्याने माथाडी कामगारांसाठी पाठपुरावा केला याचे उत्तर राष्ट्रवादीच्या त्या कामगार नेत्यांनी द्यावे, असे आव्हान करण्यात आले . कळंबोली याठिकाणी आयोजित दिनांक ११ मार्च रोजी पार पडलेल्या सुसंवाद मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ,उदयनराजे भोसले ,आमदार शशिकांत शिंदे , कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता भारतीय जनता पार्टी यांनी आतापर्यंत शेतकरी यांची फसवणूक केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला होता भारतीय जनता पार्टी चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांसाठी काय केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही असे नरेंद्र पाटील म्हणाले
काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडी सरकारच्या काळात माथाडी कामगारांचा कायदा १४ वर्षापासून धूळ खात पडून होता त्यावेळेस हे नेते कुठे गेले होते ?असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला .
जे १४ वर्षात झाले नाही ते भारतीय जनता पार्टीने दोन वर्षात करून दाखवले व माथाड्यांचे बरेचशे प्रश्न मार्गी लावले असल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली .
नवी मुंबई या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत अप्रत्यक्षरीत्या आमदार शशिकांत शिंदे व कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्यावर नरेंद्र पाटील यांनी टीकास्त्र सोडले