भाजपला शिवाजी महाराज व शेतकरीयांचा पुळका : शरद पवार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

भाजपला शिवाजी महाराज व शेतकरीयांचा पुळका : शरद पवार

भाजपला शिवाजी महाराज व शेतकरीयांचा पुळका : शरद पवार
कळंबोलीत सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

कळंबोली / लढवय्या रोखठोक
   कळंबोली शहरात न्यु इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात झालेल्या माढा  विधानसभा मतदार संघाच्या निमित्त राष्ट्रवादीच्या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
 यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ,उदयनराजे भोसले आमदार शशिकांत शिंदे , शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील , गुलाबराव जगताप , माजी आमदार दीपक साळुंखे , कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, नगरसेवक सतीश पाटील , विजय खानावकर , गोपाळ भगत यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
   यावेळी गुलाबराव जगताप यांनी   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळागाळातून एक कार्यकर्ता म्हणून आम्ही या निवडणुकी दरम्यान प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . तर आमदार शशिकांत शिंदे यांनी माढा मतदार संघात निवडणुकीदरम्यान ऐतिहासिक विजय होणार असल्याचं भाकीत केलं व उदयनराजे भोसले यांच्या सारखा नेता आम्हला लाभला असल्याचे कौतुक त्यांनी केले त्याचप्रमाणे शरद पवार यांचं उदयनराजे भोसले यांच्यावर खूप प्रेम आहे असे म्हणत थोडे प्रेम कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्यावर देखील दाखवा व अशा होतकरू कार्यकर्त्याला एक संधी द्या असे मत मांडले .
   यावर उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात शशिकांत शिंदे हे मला  हरभऱ्याच्या झाडावर चढवत असल्याची विनोदी मत मांडले
  या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांच्या भाषणाचे उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती दरम्यान शरद चंद्र पवार यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर निशाणा साधत राफेल विमान घोटाळा व नोटबंदी यावर खरपूस समाचार घेतला, ज्या छत्रपतीं शिवाजी महाराजांना  रायगडाचे जनक म्हणून संबोधले जाते याच रायगडाच्या मातीतून आजच्या सुसंवाद कार्यक्रमाची सुरुवात होते याचा मला सार्थ अभिमान असल्याचे पवार यांनी सांगितले स्वराज्याची स्थापना केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हाही भोसले म्हणून नाव लावले नाही तर रयतेचं राज्य अशी ओळख त्यांनी पटवून दिले मात्र आत्ताच सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर निवडणुकीचा जोगवा मागत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात जानेवारी २०१५ ते २०१८ मध्ये एकूण ११हजार ९९८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे त्यांनी सांगत भाजपचा नाकर्तेपणा मांडण्याचा प्रयत्न केला हे सरकार अपयशी ठरले असून यांना धडा शिकवण्याची वेळ आत्ता आलेली आहे भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत महाराष्ट्रतील जनतेची फसवणूक केली असून फेल ठरलेल्या नोट बंदीमुळे जवळपास १५ लाख तरुणांना नोकरीपासून मुकावे लागल्याचे त्यांनी सांगितले .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0