एक दिवस बाबांसाठी म.ए.सो. ज्ञानमंदीर शाळेत उपक्रम - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

एक दिवस बाबांसाठी म.ए.सो. ज्ञानमंदीर शाळेत उपक्रम

एक दिवस बाबांसाठी
 म.ए.सो. ज्ञानमंदीर शाळेत उपक्रम

तळोजा : प्रतिनिधी

    कळंबोली शहरातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर शाळेत एक दिवस बाबांसाठी या संकल्पनेतून "बाबा डे " साजरा करण्यात आला
 या कार्यक्रमाला विद्यार्थी व त्यांच्या वडिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती .
   विविध शाळा वेगवेगळ्या प्रकारे दिवस साजरे करत असतात मात्र या संस्थेने बाबांसाठी एक दिवस असावा यासाठी "बाबा डे " या दिवसासचे आयोजन केले होते .
  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या वडीलांसमोर
वडिलांवर आधारित असलेल्या गाण्यावर नृत्य सादर करत वडिलांची मन जिंकली .
  यावेळी काही गाण्यावर भावुक झालेल्या बाबांचे डोळे देखील पाणावले होते   
  या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे व्याख्यात्या मानसी वैशंपायन ,  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे महामाञ
 गोविंद कुलकर्णी , नमिता जोशी , प्रियांका फडके
 संजना बाईत आदी मान्यवर उपस्थित होते
 यावेळी मानसी वैशंपायन यांच्या व्याख्यानांनी वडिलांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी काही महत्त्वाचे विचार मांडण्यात आले . मुलांच्या मनात वडीलांबद्दल भीती वगळून प्रेम निर्माण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या अडचणी  व मनातील भावना वडिलांना स्वतःहून बोलून दाखवतील यासाठी  मार्गदर्शन करण्यात आले .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0