शहापूरात पार पडणार ११०१ आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शहापूरात पार पडणार ११०१ आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा

*रविवारी शहापूरात पार पडणार ११०१ आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा*

 *खासदर कपिल पाटील यांच्या उपक्रमाला मुख्यमंत्री राहणार हजर*

 *लढवय्या रोखठोक / कल्याण*
 
  खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघ(महाराष्ट्र) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शहापूर येथील तब्बल अकराशे एक आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाहसोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस हे या  सोहळ्याला उपस्थित राहून आदिवासी जोडप्यांना शुभाशिर्वाद देणारआहेत.
शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे घरी  दारिद्र असले तरी ही लग्नासारख्या सोहळ्यावर कर्ज काढून खर्च करण्याची हौस आदिवासी समाजातील अनेकांसाठी पुढील आयुष्यात अडचणीची ठरली आहे.
  आयुष्यातील उमेदीची वर्षे मग लग्नासाठी घेतलेले कर्जफेडण्यात व्यतित केल्याने आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी अपेक्षित प्रगती साधतायेत नाही. ही बाब लक्षात घेऊन खा. कपिल पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून या  समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  रविवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी शहापूर येथील  येथीलशिवाजीराव जोंधळे मैदानावर दुपारी १२  वाजता तब्बल अकराशे एक आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाहसोहळा आयोजित करून खा. कपिल पाटील यांनी एक आगळा वेगळा आदर्शच घालून दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला उपस्थितराहणार असल्याची माहिती  खा. कपिल पाटील यांच्या वतीने देण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून यापुर्वीही असे उपक्रम राबविण्यात आल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांसोबतच या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, खा. राजेंद्र गावित, खा. हिना गावित, आणि हरिश्चंद्र चव्हाण आदी मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.




महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0