खारघरच्या आरोग्य केंद्राची दुरवस्था, समस्या दूर करण्याची प्रितम म्हात्रे यांची मागणी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

खारघरच्या आरोग्य केंद्राची दुरवस्था, समस्या दूर करण्याची प्रितम म्हात्रे यांची मागणी


खारघरच्या आरोग्य केंद्राची दुरवस्था, समस्या दूर करण्याची  प्रितम म्हात्रे यांची मागणी

पनवेल : लढवय्या रोखठोक

   पनवेल महापालिका हद्दीत येणाऱ्या खारघर येथील आरोग्य केंद्राची दुरवस्था झालेली  आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सुविधे अभावी नागरिकांना आरोग्य केंद्रातून परत जावे लागत असल्याचा तक्रारीत वाढ होत लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील आरोग्य केंद्राला समस्या मुक्त करून नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.

        पनवेल महापालिका क्षेत्रात लोकसंख्येप्रमाणे नागरी आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे. कामोठे, कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, आणि खारघर येथे नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रात नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग आणि आरोग्य केंद्रांची दुरवस्था हे प्रश्न असताना औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.  याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. या आरोग्य केंद्रात गेले १५ दिवस पाणी नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी येथे भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याची मागणी केली आहे. पालिका उपायुक्त संध्या बावनकुळे यांच्या समवेत नागरिक यांच्यात बैठक पार पडली.  या समस्या संध्या बावनकुळे यांनी १५ दिवसात सोडविण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले आहे.

           खारघर येथील या प्राथमिक केंद्रात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. महिलांची सुरक्षा, आरोग्य केंद्राची स्वच्छता अधिक गंभीर आहे. येथील महिला स्वच्छता गृहामध्ये खिडक्यांना काचा तसेच लाईटची व्यवस्था नसल्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये पूर्णवेळ स्वच्छता कर्मचारी नियुक्त न केल्याने रुग्णांच्या आणि आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेची जबाबदारी येथील डॉक्टर आणि कर्मचारी यांना करावी लागत आहे. प्राथमिक नगरी आरोग्य केंद्राची वेळ सकाळी १० वाजताची असल्याने त्या विभागातील कामावर जाणाऱ्या नागरिकांना आरोग्य केंद्राचा लाभ घेता येत नाही त्यामुळे हि वेळ बदलून सकाळी ९ वाजताची करण्यात यावी. येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद झाल्यानंतर बाहेरील परिसरात गर्दुल्ले यांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे या गर्दुल्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. या प्रहामिक केंदारला समस्या मुक्त करून नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा पुरविण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0