जोसेफ हायस्कूलचा मराठी राजभाषा दिन साजरा... - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

जोसेफ हायस्कूलचा मराठी राजभाषा दिन साजरा...

सेंट. जोसेफ हायस्कूलचा
मराठी राजभाषा दिन साजरा...

लढवय्या रोखठोक ; मनोज भिंगार्डे

सेंट.जोसेफ विद्यालयाच्या प्रांगणात मराठी राजभाषा दिवस, साजरा करण्यात आला. जेष्ठ कवी  कुसुमाग्रज यांच्या १०७ जयंती निमित्त मराठी दिन सोहळा संपन्न झाला.सदर विविध रंगी मराठी वेशभूषा परिधान केलेले विध्यार्थी व शिक्षक अत्यंत उत्साही दिसत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पद्धतीने व पेहरावात केले. विविध प्रकारची नृत्य,ऑर्केस्ट्रा, गीतगायन,काव्यवाचन करण्यात आले. बहारदार कोळी नृत्य कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले.

मराठी दिन निमित्त विद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शब्दलेखन स्पर्धा,काव्यलेखन, निबंध लेखन, रांगोळी स्पर्धा तसेच वकृत्त्व स्पर्धांचे  आयोजन केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. केशरी फेटे आणि ढोल व लेझीम यांच्या तालावर विद्यार्थ्यांची पावले भिरकू लागली. ढोल वादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर जोरदार टाळ्यांचा वर्षाव झाला.....

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टीळा
त्याच्या संगे जागतील
रानावनातील शिळा
या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तीचे सादरी करणाने अंगावर रोमांच उभे राहिले. अत्यंत जल्लोषात व उत्साहात साजऱ्या झालेल्या य कार्यक्रमासाठी शिक्षकवृन्दानी खूप परिश्रम घेतले.
 विद्यालयाच्या मुख्य संचालिका मॅडम ग्रेस पिंटो यांच्या प्रेरणेद्वारे कार्यक्रम पार पडला.




महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0