पनवेल तहसीलदार दिपक आकडे यांची बदली
पनवेल / लढवय्या रोखठोक
पनवेलचे तत्कालीन तहसीलदार दिपक आकडे यांची पनवेल येथून बदली झालेली असून ते आता या पुढे कल्याण येथील तहसीलदार म्हणून काम पाहणार आहेत .
गेल्या चार वर्षांपासून पनवेलच्या तहसीलदार म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली होती या पुढे पनवेलचे नवीन तहसीलदार म्हणून कल्याणचे तहसीलदार अमित सानप पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे .
दिपक आकडे हे आज कल्याण तहसीलदार कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारणार आहेत .