रोडपालीची स्मार्ट वाटचाल होणार ! गावाच्या विकासासाठी १३ कोटी निधी मंजूर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

रोडपालीची स्मार्ट वाटचाल होणार ! गावाच्या विकासासाठी १३ कोटी निधी मंजूर

रोडपालीची स्मार्ट वाटचाल होणार !
 गावाच्या विकासासाठी १३ कोटी निधी मंजूर


  कळंबोली / लढवय्या रोखठोक

   कळंबोली शहराला लागून असलेल्या रोडपाली गाव आता खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला असून या गावातील ग्रामस्थांची आता गावाच्या अपुऱ्या सोई सुविधेच्या घुसटीतून सुटका होणार आहे .
  रोडपाली सह इतर ४ गावांचा या स्मार्ट गाव करण्यासाठी समावेश असून एकूण तब्बल सुमारे ४३ कोटींचा निधी महानगर पालिकेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत.
  पनवेल महानगर पालिकेच्या  वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने व प्रभाग ७ मधील कार्यासाम्राट नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्या प्रयत्नाला अखेर यश प्राप्त झालेले आहे .
   या मागे प्रभाग ७ मधील नगरसेवक राजू शर्मा , प्रमिला पाटील , विद्या गायकवाड यांची विशेष मेहनत आहे .
  रोडपाली या गावासाठी तब्बल १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून आता रोडपाली गावाचा स्मार्ट विकास होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास भाजपचे नगरसेवक अमर पाटील
यांनी व्यक्त केला आहे .
   गावातील सुज्जस रस्ते , गटारे , दिवाबत्ती , फुटपाथ , मुबलक पाणी पुरवठा , सुसज्ज सार्वजनिक शौचालय या सारख्या कामांचा यामध्ये समावेश असल्याचे अमर पाटील यांनी सांगितलं .
  निवडणुकी नंतरच्या काळात मतदारांना बऱ्याच आशा लागल्या होत्या , मात्र उशिरा का होईना  रोडपालीकरांच्या आशा या १३ कोटींच्या निधीच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामातून पूर्ण होणात आहेत .
   "शेवटी करूनच दाखवलं" या
वाक्याने कळंबोली शहरातील सत्ताधारी नगरसेवकांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे.
 नगरसेवक अमर पाटील यांनी रोडपाली गावाच्या स्मार्ट सिटी करण्याच्या मागणीसह प्रशासनाला विश्वासात घेऊन तब्बल विकास कामासाठी १३ कोटी निधी मंजूर करून दिल्या बद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0