कासाडी नदी काळवंडली - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कासाडी नदी काळवंडली

कासाडी नदी काळवंडली
प्रदूषण मंडळाचे कार्यालयाची तळोजात गरज
तळोजा / प्रतिनिधी  
लढवय्या रोखठोक 

तळोजा औद्योगिक वसाहतीच्या कचाट्यात अडकलेल्या कासाडीनदीची काही केल्या प्रदूषणाच्या 
 जाचातून सुटका होताना दिसत नाही आहे .   तळोजा तळोजा सिईटीपी शेजारी हुन वाहणाऱ्या   कासाडी नदीच्या पत्राचा रंग पुन्हा काळा , लाल , व फटफटीत पांढरा झाल्यावर पुन्हा येथील प्रदूषणाचा विषय चर्चेत येऊ लागलेला आहे .
   तळोजातून पूर्वेकडून पश्चिमेला वाहणाऱ्या एकमेव अशा कासाडीनदीची नासाडी झालेली असून प्रदूषणाबाबत याठिकानच्या काही पुढारी व सामाजिक कार्यकर्ते  यांनी या प्रकरणाला वाचा फोडून देखील पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याचे भयंकर वास्तव समोर आले आहे .
   प्रदूषण मंडळ तळोजातील प्रदूषणाबाबत केवळ मंत्री महोदयांचा विश्वास जिंकत असून प्रत्येक्षात प्रदुषण मंडळानेदेखील या कासाडीच्या पोटात विष कालवण्याच्या   प्रकाराकडे उघडपणे डोळे झाक करत आहे .
   #  चौकट #
  तळोजा परिसरात अशा प्रकारे छुप्या पद्धतीने प्रदूषण कासाडी नदीच्या पात्रात केले जात असल्याचा अंदाज आहे शिवाय सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून प्रत्येक्षात प्रक्रिया होत नसल्याचा ठपका या आधी देखील पर्यावरण मंत्री प्रवीण पोटे यांनी ठेवला होता 
  मात्र या भागात प्रदूषण मंडळाचे नियंत्रण राहत नसल्याने प्रदूषणकर्त्यांना मुभा मिळत आहेत .
 #  प्रदूषण मंडळाचे कार्यालय तळोजात असण्याची गरज .
  बेलापूर याठिकाणी प्रदूषण मंडळाचे अधिकारी असल्याने प्रत्येक वेळी त्यांना तळोजात लक्ष ठेवणे कठीण असल्याने त्यांचे काही अधिकारी व त्यांचे छोटे कार्यालय तळोजा औद्योगिक वासहतीती असणे गरजेचे आज त्यामुळे प्रदूषणावर त्यांचे नियंत्रण सोपे होईल व प्रदूषणाबाबत आळा घालता येईल .
  
 #याबाबत प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्या सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही .
   # येथील प्रदूषणाबाबत आम्ही नेहमी संबंधितांना 
फोन द्वारे तात्काळ कळवतो मात्र त्याचा काही उपयोग होत नाही .  या प्रदूषणाचा आजूबाजूच्या आमच्या ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे .
प्रदूषण मंडळाचे कार्यालय तळोजा भागात असेल तर प्रदूशनाबाबत नियंत्रण व स्थानिकांना दिलासा लाभेल
  # सुनील भोईर सामाजिक कार्यकर्ते पडघे #

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0