बेरोजगारीचा उच्चांक गाठल्याबद्दल निषेध
पनवेल तहसीलदार यांना राष्ट्रवादीचे निवेदन
पनवेल / लढवय्या रोखठोक
सत्तेवर येण्याआधी केंद्र सरकारमधील प्रमुख नेत्यांनी दरवर्षी २ कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनशून्य व निष्क्रिय धोरणांमुळे बेरोजगारीचा उच्चांक गाठल्याचा आरोप करत पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने निषेध करत पनवेल तहसीलविभागाला निवेदन देऊन अशा घोषणांचा निषेध करण्यात आला .
उद्योगपतींचे कोट्यावधींचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारने मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, प्रधानमंत्री युवा योजना च्या माध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्माण केला जात आहे असे चित्र निर्माण केले होते. मात्र प्रत्येक्षात ही नुसती खोटी आश्वासनच असल्याचे राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगत थेट या निषेधा बाबत पनवेल तहसील विभागाला निवेदन दिले .
यावेळी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील , कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, प्रदीप ठाकूर, तुषार पाटील,चंद्रकांत राऊत, बबन पवार, आनंद भंडारी, किशोर देवदेकर ,शर्मेश राठोड यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.