शेवटी करून दाखवलं . हायवे लगत डेब्रिजचा भराव टाकून हॉटेल , पार्किंगची सोय - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शेवटी करून दाखवलं . हायवे लगत डेब्रिजचा भराव टाकून हॉटेल , पार्किंगची सोय

शेवटी करून दाखवलं .
  हायवे लगत डेब्रिजचा भराव टाकून हॉटेल , पार्किंगची सोय
(पनवेल महानगर पालिकेने केला होता कानाडोळा)

तळोजा/ लढवय्या रोखठोक

   मुंब्रा पनवेल महामार्गावर तळोजा भागात सध्या भूमाफियांनी उच्छाद मांडलेला आहे .
 रस्त्यालगत डेब्रिजचे डंपर ओतून चक्क प्रशस्त पार्किंगची व हळूहळू मोठमोठे हॉटेल थाटण्याच्या स्पर्धा सुरू असताना 
  मुंब्रा पनवेल महामार्गा लगत असलेल्या पेंधर रेल्वे फटकाच्या हायवेला डेब्रिज टाकून रातोरात जागा बाळकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .
  सदर जागा सिडको च्या देखरेखेखाली असल्याचे ही समोर येत आहे मात्र सिडको आपले भूखंड मोकळे ठेवण्यासाठी अपयशी असल्याने भकास परिस्थिती निर्माण होत आहे .
हा परिसर महानगर पालिकेत येत असल्याने या बाबत पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना पाच महिन्या अगोदर हा प्रकार कळवून देखील कोणती ही कारवाई झाली नाही शिवाय येथील वॉर्ड अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुठे आहे डेब्रिजचा भराव ? असा उलट प्रश्न विचारून याबाबत जबाबदारी झटकत वेळ मारून नेली होती.
  त्यानंतर आज स्थितीला याठिकाणी भूमाफियांनी डेब्रिजचा भराव करून याठिकाणी अवजड वाहनांची पार्किंग सुरू केली आहे .
त्यामुळे आता या जागेत भंगार व्यावसायिक , टायर गोडाऊन ,हॉटेल थाटण्याची शक्यता आहे .
   याबाबत आता कोणती कारवाई होणार याकडे लक्ष आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0