कळंबोलीमध्ये सांडपाण्याचे गटार ओव्हरफ्लो. नागरिकांच्या घराघरात घुसले सांडपाणी. - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीमध्ये सांडपाण्याचे गटार ओव्हरफ्लो. नागरिकांच्या घराघरात घुसले सांडपाणी.

कळंबोलीमध्ये सांडपाण्याचे गटार ओव्हरफ्लो.
नागरिकांच्या घराघरात घुसले सांडपाणी.
  मनसेच्या महिला शहर अध्यक्ष स्नेहल बागल यांनी काढला महिलांचा मोर्चा

लढवय्या रोखठोक

कळंबोली
                 
कळंबोली येथील नागरिकांना  सांडपाण्याच्या गटारांच्या तुंबण्याचा फटका बसला असून या गटारांचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसून नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. याबाबत कळंबोली मनसेच्या महिला शहराध्यक्ष स्नेहल बगल यांनी मंगळवारी सिडकोच्या विरोधात आवाज उठविताच सिडकोच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबल्याचेच समोर आले आहे.
                     पनवेल महानगरपालिकेचा स्वछता सर्वेक्षण २०१९ मधील सहभाग कोटी योग्य आहे यावर विचार विनिमय करण्यासारखा काहीसा प्रकार सिडकोच्या कर्मचाऱ्यांकडून होताना दिसत आहे. एका बाजूला सर्वेक्षणात भाग घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला पनवेलचे नाव खराब करायचे, कळंबोली कॉलोनी येथे राहणारे बहुतांश नागरिक हे बाहेरच्या ठिकाणाहून आले आहेत. या नागरिकांची देखरेख पनवेलकर म्हणून प्रशासन घेत नसेल तर नागरिकांकडून संपूर्ण देशभर पनवेलची निंदानालस्ती होण्यास वेळ लागत नाही. प्रशासन म्हणून कामगार काम करतात, मात्र ते खरोखरच काम करतात का? यावर नियंत्रण कोण ठेवणार. एखादा प्रकार घडला आणि अधिकाऱ्यांना विचारणा केली तर आम्ही त्याठिकाणी आमची माणसे ठेवली आहे एवढेच उत्तर कितपत योग्य आहे? प्रशासनाचे अधिकारी म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे ती कामगारांचे काम कशा पद्धतीने चालले आहे हे तपासण्याचे. मात्र कळंबोलीमधील झाला प्रकार हा पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील इतर भागातही होऊ शकतो. काळुंद्रे येथील घटना ताजी असतानाच कळंबोलीमध्ये गटारे तुंबून त्याचे सांडपाणी जनतेच्या घरांमध्ये घुसत आहे.
                     यावेळी मंगळवारी मनसेच्या स्नेहल बागल यांनी महिलांना एकत्र करीत सिडकोला जाब विचारण्याचा पवित्रा हाती घेतल्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून येथील नागरिकांची चुकी असल्याचे भासवत आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. जर अधिकारीच असे वागत असतील तर नागरिकांच्या आरोग्याचा आणि सोयीसुविधांचा विचार कोण करणार असा प्रश्नच यानिमित्ताने कळंबोलीकरांना पडला आहे.

कोट :
                    कळंबोली के एल - वन, सेक्टर-५ ई मध्ये गेले काही दिवसांपासुन सिडको मेन गटार चेंबर भरुन घाण पाणी संपुर्ण आजुबाजुच्या परीसरात वाहत त्याचा नागरीकाना त्रास होत आहे, घाण पाण्यामुळे मच्छर, रोगराईचे जंतु पसरत आहे, यामुळे लाेक आजारी पडत आहेत. याची वारंवार सिडको ऑफिसला तक्रार करुनही याकडे लक्ष देत नाहीत. याला जवाबदार कोण? हा प्रश्न नागरीकांना भेडसावत आहे.
- स्नेहल बागल,  महिला शहर अध्यक्ष, कळंबोली, म.न.से.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0