ते सगळे माजी काँग्रेसवासिय पुन्हा स्वगृही परत येतील... - महेंद्र घरत - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

ते सगळे माजी काँग्रेसवासिय पुन्हा स्वगृही परत येतील... - महेंद्र घरत


ते सगळे माजी काँग्रेसवासिय पुन्हा स्वगृही परत येतील... - महेंद्र घरत 

लढवय्या रोखठोक / पनवेल
  (साहिल रेळेकर)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २४ जानेवारी रोजी भव्य जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्त पनवेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .
गुरुवारी २४ दुपारी १.३० वाजता पनवेल येथील प्लॉट नं. १२५ ए. ५ येथे या संघर्ष यात्रा सभेचे आयोजन करण्यात येणार असून या संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री  अशोकराव चव्हाण, बी एम संदीप, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आ. नसीम खान, आ. भाई जगताप, आ. विश्वजीत कदम, आ. एम एम शेख, महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेशअध्यक्षा सौ. चारुशीला टोकस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेस अध्यक्ष सत्यजित तांबे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमाकांत म्हात्रे, राजू वाघमारे, रमेश कीर आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. साधारण ७ ते ८ हजार कार्यकर्ते या संघर्ष यात्रेत सहभागी होतील असा दावा यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आला.
 यावेळी बोलताना महेंद्र घरत म्हणाले की २०१९ ला काँग्रेस ची सत्ता आल्यावर काँग्रेस सोडून गेलेले सर्व काँग्रेसवासिय राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पुन्हा आपल्या स्वगृही परततील यात शंकाच नाही कारण पुढची किमान १५ वर्षे तरी भाजपा ला सत्ता मिळणार नाही. कारण एकदा काँग्रेस सत्तेत आली की भाजपा १५ वर्षे बॅकफुट ला जाते या गोष्टीला इतिहास साक्ष आहे असा आत्मविश्वासही यावेळी घरत यांनी व्यक्त केला.
या संघर्ष यात्रेत कोणालाही विकत घेऊन किंवा कोणत्याही प्रकारचे आमिष देऊन आणले जाणार नाही. जे सच्चे काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते व सामान्य जनता आहे त्यांना कोणत्याही आमिषाची गरज भासत नाही असे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांनी केले. इतरांप्रमाणे काँग्रेस विकतची गर्दी कधी जमवत नाही, जे काही शक्ती प्रदर्शन असेल ते पैशांच्या जीवावर न करता निष्ठावंत कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संघर्ष यात्रेत करतील असा ठाम विश्वासही जिल्हाध्यक्ष आर सी  घरत यांनी व्यक्त केला.

पनवेल येथे बऱ्याच कालावधी नंतर काँग्रेस ची मोठी सभा होत असून यावेळी अंदाजे ५०० ते ७०० कार्यकर्ते काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची देण्यात आली आहे. यात काही जिल्ह्यातील मोठी नाव देखील आहेत ती योग्य वेळी प्रवेशादरम्यान जाहिर करण्यात येतील त्यापैकी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदलाल मूंगाजी हे देखील संघर्ष यात्रा सभेदरम्यान प्रवेश करतील अशी माहीत महेंद्र घरत यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस पनवेल तालुका अध्यक्ष महादेव कटेकर, महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस सौ. निर्मला म्हात्रे, पनवेल शहर अध्यक्ष सुदाम पाटील, खालापुर तालुका अध्यक्ष रमेश म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, माजी नगरसेविका शशिकला सिंघ आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0