शिक्षण संस्थांचा मोकळ्या मैदानावर डोळा कारमेल शाळेला मैदान मोकळे करण्याच्या सिडकोच्या सूचना - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

शिक्षण संस्थांचा मोकळ्या मैदानावर डोळा कारमेल शाळेला मैदान मोकळे करण्याच्या सिडकोच्या सूचना

 शिक्षण संस्थांचा मोकळ्या मैदानावर डोळा

कारमेल शाळेला मैदान मोकळे करण्याच्या सिडकोच्या सूचना

कळंबोली / लढवय्या रोखठोक




   सिडको हद्दीतील  शाळांनी शालेय सुट्टी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी  मैदाने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्याच्या सूचना असताना देखील ही मैदाने  बळजबरी बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अशा शिक्षण संस्थांना आता अद्दल घडवण्याची वेळ आली असतानाच कळंबोलीतील
 अमर सेवा समितीच्या सेक्टर ८ भूखंड क्रमांक १५ वरील
कारमेल कॉन्व्हेंट शाळेला सिडकोने  तंबी दिली असून
या शाळेच्या जागे , व्यतिरिक्त असलेली सार्वजनिक जागा ( मोकळे मैदान )  तात्काळ सर्व सामन्यासाठी खुले करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत .
 
मात्र आता पर्यंत फुकटात मैदाने लटणाऱ्या अशा संस्थांनी मैदाना भोवती टोलेजंग भिंती उभारून या जागांवर मालकी हक्क दाखवायला सुरवात केली आहे .
 त्यामुळे सिडकोच्या आदेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे
    कळंबोली शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंखेचा विचार करता येथील युवकांना खेळण्यासाठी मैदाने शोधावी लागत आहेत मात्र नियमांचे उल्लंघन करून शाळेच्या खाजगी वापरासाठी मैदाने बाळकवण्याचा  प्रयत्नांना सिडकोने आता पर्यंत पाठीशी घातले आहे .
   कळंबोली शहरात असलेल्या कारमेल प्रमाणे इतर शाळांनी देखील राजकीय व पैशाच्या जोरावर सिडकोला या मैदाना बाबत तोंड बंद ठेवायला सांगितल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही या बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिडको एम डी लोकेश चंद्र यांच्याकडे रितसर तक्रार आता केली जाणार आहे
 जेणे करून फुकट्या शैक्षणिक संस्थांच्या ताब्यातून बळकावण्यात येणारी मैदाने क्रीडा प्रेमींसाठी खुली केली जातील अशी आशा कळंबोलीच नव्हे तर सिडको हद्दीतील रहिवासी करताहेत.
   नगरसेविका राणी कमल कोठारी यांनी करमेल शाळेच्या मोकळे मैदान खुले करण्यासाठी पाठपुरावा केल्या नंतर सिडकोने कागदोपत्री आदेश येत्या १६ तारखेला जारी करत संस्थेला तंबी दिली आहे मात्र मैदाना भोवती उभारलेल्या टोलेजंग भिंती व प्रवेशद्वारावर शाळे नंतर लावलेले मोठे कुलूप याची खुले करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे . ही मैदाने कधी या शाळांच्या कचाट्यातून मोकळी होतात हेच पाहणे गरजेचे आहे.

   #*चौकट
 शाळांच्या मैदाना बाहेर सिडकोने ही मैदाने शालेय सुट्टी व्यतिरिक्त खुली राहतील अशा सूचना दर्शक फलक शाळेच्या प्रांगणात लावलेले असून देखील
    राजकीय पुढारी व मुजोर शिक्षण संस्थांच्या दबावामुळे मैदानात शिरकाव करण्यासाठी मज्जाव केला जात आहे*

   #कोट
  पूर्वी शाळेच्या मैदानात क्रिकेट , कब्बडी सारखे मैदानी खेळ खेळण्यासाठी उत्साह असायचा हल्ली शाळेच्या मैदाना भोवती टोलेजंग भिंती व प्रवेशद्वारावर कुलूप व सुरक्षा असल्याने जाता येत नाही .
  प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन मैदाने मोकळी करण्याची मोहीम राबविली पाहिजे .
    मंगेश पवार ( क्रीडाप्रेमी ) 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0