*फिटनेस फोटोग्राफर आकाश कुंभार करणार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

*फिटनेस फोटोग्राफर आकाश कुंभार करणार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड*

*फिटनेस फोटोग्राफर आकाश कुंभार करणार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड*

मुंबई : लढवय्या रोखठोक

प्रतिनिधी :
vinaya sawant @dreamerspr


  वेगवेगळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स फोटोग्राफर आकाश कुंभार लवकरच १० तास ४५ मिनीटांमध्ये ४०० मॉडेल्सचे ११००० फोटो काढण्याचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी विक्रम नोंदविन्याच्या तयारीत  आहे.
   २०१८ मध्ये एशिया आणि मीडलइस्टच्या वॉव अवॉर्ड्सने आकाशला आउटस्टॅंडिग फॅशन फोटोग्राफर हा सन्मान देऊन गौरवन्यात आले होते .
   ‘बी’ ह्या आंतरराष्ट्रीय लाइफस्टाइल मॅगजीनच्या कवरपेजसाठी तीनदा फोटोशूट केलेला आकाश फॅशनवल्डमधलं मोठं नाव मानले जाते .
 सूत्रांच्या अनुसार, आकाशने आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाइनर्ससाठी तसेच ग्लॅमरवल्डमधल्या आणि स्पोर्ट्सवल्डमधल्या राष्ट्रीय आणि आंततराष्ट्रीय मॉडेल्ससाठी पोर्टफोलिओ शूट केले आहे. आजवर १०० हून अधिक मॉडेल्सचे फोटोशूट केलेल्या आकाशने आता १२ जानेवारीला अवघ्या ११ तासांमध्ये ११ हजार फोटो काढण्याचा विक्रम नोंदवण्याचे ठरवले आहे.
  आकाश कुंभार आपल्या विक्रमाविषयी म्हणतो, “मी २०१२ पासून फिटनेस इंडस्ट्रीत काम करतोय. मी अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या मॉडेल्ससाठी फोटोशूट केले आहे. पण हे करताना भारतात फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता नसल्याचे मला जाणवले. मला हा विक्रम नोंदवून फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता आणायची आहे. फोटोग्राफीकडे व्यावसायिकष्टीने न पाहता, कलात्मक माध्यमातून नव्या पिढीने पाहावे, ह्यासाठी मी हा विक्रम नोंदविण्यासाठी कटिबद्ध आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0