कळंबोली मॅकडोनाल्ड समोरील पार्किंगची डोकेदुखी
कळंबोली / लढवय्या रोखठोक
कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेल समोरील ठिकाणी येणाऱ्या खवय्यांच्या वाहनांची केली जाणारी पार्किंग सध्या याठिकानाहून प्रवास करणाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे , या ठिकाणी रस्त्यावरच गाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे .शिवाय त्यामुळे रस्त्यावरील भिकाऱ्यांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे . रात्रीच्या वेळेस मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे .
या ठिकाणी नो पार्किंग असताना देखील कोणत्याही प्रकारे कोणाला ही ना जुमानता येथे पार्किंग कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा मोठा प्रश्न उपस्थित आहे .
याबाबत कळंबोली वाहतूक शाखेच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे .या प्रकारच्या पार्कींगवर तात्काळ कारवाई करत हा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करून सर्व सामन्यासाठी खुला करावा अशी मागणी होत आहे .