*आयुक्त गणेश देशमुख यांनी खारघरमधील सोसायट्यांना दिली भेट*
खारघर / लढवय्या रोखठोक
खारघर येथील
हाईड पार्क सोसायटी चे सचिव मंगेश रानवडे यांनी सोसायटीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करत असल्याबाबत
हाईड पार्क सोसायटी चे सचिव मंगेश रानवडे यांनी सोसायटीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करत असल्याबाबत
पनवेल महापालिकेला माहिती दिली. सोसायटीतच कचरा वर्गीकरण होऊन कमीत कमी कचरा बाहेर जात आहे. ओल्या कच-यावर प्रक्रिया केली जाते. याबाबत आयुक्तांनी वस्तुस्थिती जाणून घेत
सर्व सोसायटी प्रबंधक मंडळींचे याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी आयुक्तांच्या समवेत सहा.आयुक्त शाम पोशट्टी, प्रभाग समिती अ चे सभापती अभिमन्यू पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती लीना गरड, नगरसेवक निलेश बाविस्कर, हरेश केणी ,अजीज पटेल, गुरुनाथ गायकर, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील तसेच प्रभाग अधिकारी भगवान पाटील, स्वच्छता निरीक्षक दौलत शिंदे, शैलेश गायकवाड , जितेंद्र मडवी उपस्थित होते
संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन कशा पद्धतीने पनवेल महानगरपालिका राबवीत आहे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच एकूण महानगरपालिका क्षेत्रात योग्य पद्धतीने नियोजन, ७४ वाहनांना जीपीएस सिस्टिम लावण्यात आली आहे तसेच आपल्याला यापुढे सर्व प्रकारची माहिती वेबसाइटवर उपलब्ध असून आपल्या क्षेत्रात किती कर्मचारी काम करतात याची माहिती तत्पर उपलब्ध होणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी उपस्थितांना सांगितले

याच बरोबर आयुक्त व इतर नगरसेवक यांनी केसर हार्मोनी या सोसायटीला भेट दिली. तेथेही ओला व सुका जागीच वेगळा केला असून त्यासाठी खत निर्मिती प्रकल्पही सोसायटीने तयार केला असून त्यामध्ये निर्माण होणारे खत हे बागेसाठी वापरण्यात येत असल्याचे सोसायटी पदाधिका-यांनी सांगितले.